वांगी भरीत वडे | VANGI bharit vade Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • VANGI bharit vade recipe in Marathi,वांगी भरीत वडे, Chayya Bari
वांगी भरीत वडेby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

वांगी भरीत वडे recipe

वांगी भरीत वडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make VANGI bharit vade Recipe in Marathi )

 • भाजलेले भरताचं मोठं वांगं 1
 • कांदा पात किंवा कांदा कापून 1 वाटी
 • हिरवी मिरची पेस्ट 1 ते 1.5 चमचा
 • आले लसूण पेस्ट 1 चमचा
 • जिरे,मोहरी,हिंग फोडणीसाठी
 • कोथिंबीर बारीक कापून 1 वाटी
 • हळद 1 चमचा
 • शेंगदाणे 1 चमचा
 • शेंगदाणे कूट जाडसर 2 चमचे
 • मीठ चवीनुसार
 • बाजरी पीठ 2 वाट्या
 • तेल तळण्यासाठी व भरीत साठी

वांगी भरीत वडे | How to make VANGI bharit vade Recipe in Marathi

 1. प्रथम भरीतची तयारी करावी व बाजरीच्या पिठात चवीला मीठ व 1 चमचा गरम तेल घालून कोमट पाण्याने भजी च्या पिठासारखे भिजवावे
 2. मग तेल तापवून जिरे,मोहरी,हिंग फोडणी करावी त्यात शेंगदाणे परतावे
 3. मग आले लसूण पेस्ट,हिरवी मिरची पेस्ट,कांदा किंवा कांदा पात परतून हळद मीठ दाण्याचा कूट घालून परतावे
 4. मग भाजलेले वांगे घालून परतून वाफ घ्यावी कोथिंबीर घालून हलवून उतरून भरीत गार करावे
 5. आता भरीतचे गोल गोळे करून भिजवलेल्या बाजरीच्या पिठात घोळावे
 6. तेल तापवून त्यात वडे सोडून तळावे
 7. दोन्ही बाजूने छान तळून घ्यावे व चटणी बरोबर सर्व्ह करावे

My Tip:

भरीत भाकरीची चव अनुभवता येते भाकरी खायला वेळ लागतो वडे पटापट गट्टम होतात

Reviews for VANGI bharit vade Recipe in Marathi (0)