चटपटीत चना चाट कटोरी | Testy Chana Chat Katori Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Testy Chana Chat Katori recipe in Marathi,चटपटीत चना चाट कटोरी, Bharti Kharote
चटपटीत चना चाट कटोरीby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

चटपटीत चना चाट कटोरी recipe

चटपटीत चना चाट कटोरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Testy Chana Chat Katori Recipe in Marathi )

 • कटोरीसाठी.....
 • अर्धी वाटी गव्हाचे पीठ
 • अर्धी वाटी मैदा
 • पाव चमचा ओवा
 • एक चमचा तेल
 • चवीनुसार मीठ
 • आवश्यकतेनुसार पाणि
 • तळण्यासाठी तेल
 • चाट साठी......
 • दिड वाटी चने (जे घरात असतील ते..)
 • एक चमचा लाल तिखट
 • एक चमचा गरम मसाला
 • पाव चमचा जीरे हळद
 • चवीनुसार मीठ
 • एक कांदा बारीक चिरलेला
 • एक टोमॅटो बारीक चिरलेला
 • अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली
 • चाट मसाला आवडीप्रमाणे
 • बारीक शेव

चटपटीत चना चाट कटोरी | How to make Testy Chana Chat Katori Recipe in Marathi

 1. कटोरीसाठी. ...एका वाडग्यात पीठ घेऊनत्यात सर्व जिन्नस घालून मळून घ्या. .
 2. त्यांच्या छोट्या लाटया करा. .
 3. पूरीपेक्षा थोडी मोठी पोळी लाटा..
 4. एक मिडीयम आकाराची स्टीलची वाटी घ्या
 5. ती पालथी ठेवा. .त्या वर ती पोळी ठेवा
 6. सर्व बाजूंनी बोटांनी प्रेस करा. .
 7. गॅस वर पॅन मध्ये तेल तापत ठेवा
 8. पॅन मध्ये तेलात वाटी सोडा..
 9. 2 मी.वाटी आपोआप मोकळी होते. .
 10. ती बाहेर काढून घ्या. .
 11. आणी पीठाची कटोरी चांगली तळून घ्या. .
 12. आतून बाहेरून खरपूस तळून घ्या. .
 13. छान तपकिरी कलर आलाय. .
 14. अशा पध्दतीने दुसरी कटोरीपण तळून घ्या. .
 15. आता आपण चना चाट करून घेवू. ...चने राञभर भिजत घालायचे. .सकाळी कूकर मध्ये 5 शिट्ट्या करून घ्या. .
 16. पॅन मध्ये तेल टाकून जीरे टाका..त्यात चने घालून लाल तिखट हळद मीठ गरम मसाला घालून चांगल परतून घ्या. .गॅस बंद करा. .
 17. त्यात चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर घालून चांगल मिक्स करून घ्या. ..
 18. आता एका डीश मध्ये तळलेली कटोरी एक पालथी आणि एक त्या वर उतानी अशी ठेवा. .
 19. त्यात चना चाट घालून त्या वर बारीक शेव कोथिंबीर चाट मसाला भूरभूरवा. ..आणि शेव सोबत सर्व्ह करा. ..

My Tip:

कटोरी मध्यम आचे वर तळावी कुरकुरीत होते...

Reviews for Testy Chana Chat Katori Recipe in Marathi (0)