मुख्यपृष्ठ / पाककृती / चटपटीत चना चाट कटोरी

Photo of Testy Chana Chat Katori by Bharti Kharote at BetterButter
917
3
0.0(0)
0

चटपटीत चना चाट कटोरी

Jul-15-2018
Bharti Kharote
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटपटीत चना चाट कटोरी कृती बद्दल

चटपटीत आणि चमचमीत खाद्यपदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कटोरीसाठी.....
  2. अर्धी वाटी गव्हाचे पीठ
  3. अर्धी वाटी मैदा
  4. पाव चमचा ओवा
  5. एक चमचा तेल
  6. चवीनुसार मीठ
  7. आवश्यकतेनुसार पाणि
  8. तळण्यासाठी तेल
  9. चाट साठी......
  10. दिड वाटी चने (जे घरात असतील ते..)
  11. एक चमचा लाल तिखट
  12. एक चमचा गरम मसाला
  13. पाव चमचा जीरे हळद
  14. चवीनुसार मीठ
  15. एक कांदा बारीक चिरलेला
  16. एक टोमॅटो बारीक चिरलेला
  17. अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली
  18. चाट मसाला आवडीप्रमाणे
  19. बारीक शेव

सूचना

  1. कटोरीसाठी. ...एका वाडग्यात पीठ घेऊनत्यात सर्व जिन्नस घालून मळून घ्या. .
  2. त्यांच्या छोट्या लाटया करा. .
  3. पूरीपेक्षा थोडी मोठी पोळी लाटा..
  4. एक मिडीयम आकाराची स्टीलची वाटी घ्या
  5. ती पालथी ठेवा. .त्या वर ती पोळी ठेवा
  6. सर्व बाजूंनी बोटांनी प्रेस करा. .
  7. गॅस वर पॅन मध्ये तेल तापत ठेवा
  8. पॅन मध्ये तेलात वाटी सोडा..
  9. 2 मी.वाटी आपोआप मोकळी होते. .
  10. ती बाहेर काढून घ्या. .
  11. आणी पीठाची कटोरी चांगली तळून घ्या. .
  12. आतून बाहेरून खरपूस तळून घ्या. .
  13. छान तपकिरी कलर आलाय. .
  14. अशा पध्दतीने दुसरी कटोरीपण तळून घ्या. .
  15. आता आपण चना चाट करून घेवू. ...चने राञभर भिजत घालायचे. .सकाळी कूकर मध्ये 5 शिट्ट्या करून घ्या. .
  16. पॅन मध्ये तेल टाकून जीरे टाका..त्यात चने घालून लाल तिखट हळद मीठ गरम मसाला घालून चांगल परतून घ्या. .गॅस बंद करा. .
  17. त्यात चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर घालून चांगल मिक्स करून घ्या. ..
  18. आता एका डीश मध्ये तळलेली कटोरी एक पालथी आणि एक त्या वर उतानी अशी ठेवा. .
  19. त्यात चना चाट घालून त्या वर बारीक शेव कोथिंबीर चाट मसाला भूरभूरवा. ..आणि शेव सोबत सर्व्ह करा. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर