रेनबो डोसा | Rainbow dosa Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Rainbow dosa recipe in Marathi,रेनबो डोसा, Maya Ghuse
रेनबो डोसाby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

0

रेनबो डोसा recipe

रेनबो डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rainbow dosa Recipe in Marathi )

 • कणीक पाऊण वाटी
 • बाजरी पीठ पाऊण वाटी
 • ज्वारी पीठ पाऊण वाटी
 • बेसन पाऊण वाटी
 • कॉर्नफ़्लेावर पाऊण वाटी
 • तांदळाचे पीठ पाऊण वाटी
 • मैदा पाऊण वाटी
 • ताक 1 ग्लास
 • मीठ चवीनुसार
 • ओवा 2 चमचे
 • तेल अर्धी वाटी
 • हिरवी मिरची पेस्ट अर्धी वाटी
 • उकडलेला बटाटा 2
 • कांदा 1 चिरून
 • धना पावडर पाव चमचा
 • टमाटे पेस्ट 1 वाटी
 • खोबरा किस अर्धी वाटी

रेनबो डोसा | How to make Rainbow dosa Recipe in Marathi

 1. बाजरी पीठ, ज्वारी पीठ, कणीक, बेसन, तांदळाचे पीठ, मैदा, कॉर्नफ़्लेावर सर्व पीठ घेतले
 2. मीठ, ओवा टाकून ताकाने भिजवून 30 मी. ठेवले
 3. कढईत तेल तापवून जिरं मोहरी टाकली कांदा चिरून टाकला हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, हळदं, धना पावडर, स्मैश केलेला बटाटा मीठ, लिंबाचा रस टाकून मिसळून घेतलं
 4. हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदीना, मीठ, जिरं घालून मिक्सरमधून बारीक वाटून घेतले - ही झाली हिरवी चटणी
 5. टमाटे चिरून मिक्सरमधून पेस्ट केली पातेल्यात टाकून गरम करून त्यात गूळ व मिरं पूड ,मीठ टाकून मिसळून घेतलं - टमाटा पेस्ट चटणी
 6. खोबरा किस, तिखट, मीठ,पिठी साखर मिसळवली - खोबरा चटणी
 7. गैसवर नॉनस्टीक तवा गरम करून त्यावर प्रथम तांदळाचे पीठाचा डोसा टाकून टोमैटो चटणी लावून फोल्ड केला
 8. आता उरलेल्या भागावर ज्वारीच्या पीठाचं मिश्रण टाकून अर्धा डोसा टाकून बटाटा भाजी लावून घेतली व फोल्ड केला
 9. आता अर्ध्या भागात कणकेचे पिठाचा डोसा टाकून हिरवी चटणी भरून फोल्ड केला
 10. आता अर्ध्या भागात कॉर्नफ़्लेावरच्या पीठाचा डोसा टाकून टोमैटो चटणीचे मिश्रण लावून फोल्ड केला
 11. आता बाजरीचे पीठाचा अर्धा डोसा टाकून त्यावर हिरवी चटणी लावून फोल्ड केला
 12. आता बेसन पीठाचा अर्धा डोसा टाकून त्यावर बटाटा भाजीचे मिश्रण लावून फोल्ड केला
 13. अाता अर्ध्या भागात मैद्याचा डोसा टाकून त्यावर खोबरा चटणी लावून फोल्ड केला छान पलटवून भाजून घेतला
 14. दह्याबरोबरही सर्व्ह केले

My Tip:

आवडीनुसार चटण्या वापरू शकता

Reviews for Rainbow dosa Recipe in Marathi (0)