गव्हाच्या पिठाच्या गोड नूडल्स | Wheat flour sweet noodles Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Wheat flour sweet noodles recipe in Marathi,गव्हाच्या पिठाच्या गोड नूडल्स, Rohini Rathi
गव्हाच्या पिठाच्या गोड नूडल्सby Rohini Rathi
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

गव्हाच्या पिठाच्या गोड नूडल्स recipe

गव्हाच्या पिठाच्या गोड नूडल्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Wheat flour sweet noodles Recipe in Marathi )

 • गुळ एक कप
 • गव्हाचे पीठ एक कप
 • पाणी अर्धा कप
 • बडीशोप एक टेबल स्पून
 • वेलची पूड 1 टिस्पून
 • गूळ अर्धा कप
 • बारीक कापलेले काजू-बदाम दो टेबल स्कूल
 • तांदळाचे पीठ दोन टेबल्स्पून

गव्हाच्या पिठाच्या गोड नूडल्स | How to make Wheat flour sweet noodles Recipe in Marathi

 1. अर्धा कप पाण्यामध्ये एक कप गूळ मिसळून गुळाचे पाणी बनवून घ्यावे
 2. गव्हाच्या पिठामध्ये गुळाचे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावे
 3. तयार पीठ पासून छोटी-छोटी गोळे बनवून हाताने वळून पातळ लांब नूडल्स बनवून घ्यावे
 4. अशाप्रकारे सर्व पिठाच्या नूडल्स बनवून घ्याव्यात
 5. पॅनमध्ये एक कप पाणी गरम करून त्यामध्ये अर्धा कप गूळ घालून त्याचे सिरप बनवून घ्यावे
 6. तयार न्युडल्स मध्ये एक टेबल स्पून तांदळाचे पीठ शिंपडून नूडल्स मोकळ्या करून घ्यावा त्यामुळे नूडल्स एक दुसऱ्याला चिटकत नाही
 7. तयार नूडल्स सिरपमध्ये घालून मंद आचेवर शिजू द्यावे
 8. गुळाच्या सिरपमध्ये एक टेबल स्कूल बडीशोप घालावी
 9. सिरप घट्ट होण्यासाठी तांदळाचे पीठ मिसळून मंद आचेवर झाकण लावून शिजवून घ्यावे
 10. शेवटी काजू बदामाचे तुकडे घालून बाऊलमध्ये गरम गरम सर्व करावे
 11. अशाप्रकारे गव्हाच्या पिठाच्या नूडल्स तयार आहे

My Tip:

नूडल्स पातळ बनवाव्या लवकर शिजतात

Reviews for Wheat flour sweet noodles Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo