खोबऱ्याच्या दुधात ले रंगीत तांदुळाचे बॉल्स | Rainbow Rice Balls in coconut Milk Recipe in Marathi

प्रेषक जयश्री भवाळकर  |  15th Jul 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Rainbow Rice Balls in coconut Milk recipe in Marathi,खोबऱ्याच्या दुधात ले रंगीत तांदुळाचे बॉल्स, जयश्री भवाळकर
खोबऱ्याच्या दुधात ले रंगीत तांदुळाचे बॉल्सby जयश्री भवाळकर
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

1

खोबऱ्याच्या दुधात ले रंगीत तांदुळाचे बॉल्स recipe

खोबऱ्याच्या दुधात ले रंगीत तांदुळाचे बॉल्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rainbow Rice Balls in coconut Milk Recipe in Marathi )

 • 4 मोठे चमचे तांदुळाचे पिठ
 • 2 मोठे चमचे कोकोनट मिल्क पावडर
 • 3 मोठे चमचे साखर
 • 1 मोठा चमचा आयसिंग शुगर
 • एक चिमूट मिठ
 • 4 प्रकार चे खायचे रंग लाल,हिरवा,निळा,आणि पिवळा
 • पाणी आवश्यकतानुसार
 • 1/4 कप तांदुळाचे पिठ अजून

खोबऱ्याच्या दुधात ले रंगीत तांदुळाचे बॉल्स | How to make Rainbow Rice Balls in coconut Milk Recipe in Marathi

 1. पाण्यानी तांदुळाचे पिठ मळून घ्या.
 2. आता ह्या मळलेल्या पिठा चे 4 भाग करा.
 3. प्रत्येक भागात 1-1 टिम्ब रंग टाकून नीट मिक्स करून मळून घ्या.
 4. ह्या रंगीत पिठांचे अगदी छोटे छोटे गोळ्या करा आणि त्या तांदुळाच्या पिठात घोळवून ठेवा.
 5. आता एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा त्यात चिमूट भर मिठ आणि 1/2 चमचा साखर घाला.
 6. उकळून ह्या गोळ्या उकळून वर येवू द्या.
 7. आता ह्या गोळ्या चाळणी नी काढून घ्या बर्फाच्या पाण्यात घालून ठेवा.
 8. आता एका दुसऱ्या भांड्यात 100 ml पाणी त्यात कोकोनट पावडर मिक्स करून एक उकळी आणा.
 9. ह्यात थंड झालेल्या गोळ्या चाळणीने काढून घ्या.
 10. खोबऱ्याच्या दुधात रंगीत गोळ्या नीट मिक्स करा.
 11. सर्व्हिंग बाउल मधे काढून सर्व्ह करा

My Tip:

कोकोनट मिल्क पावडर आपल्या आवडीनुसार जास्त घालू शकता.

Reviews for Rainbow Rice Balls in coconut Milk Recipe in Marathi (1)

Mukta Deolalikar4 months ago

सुंदर रेसेपी आहे
Reply
जयश्री भवाळकर
4 months ago
धन्यवाद ,जरूर try करा.
जयश्री भवाळकर
4 months ago
धन्यवाद ,जरूर बनवून बघाल.

Cooked it ? Share your Photo