मैदा , गहु पीठ, रवा मिठ घालून मिक्स करावे
तुपाचे मोहन घालून पीठ घट्ट भिजवून ठेवावे
बेसन नुसते भाजावे, खसखस भाजून घ्यावी, त्यात खवा भाजून घालावा
यात बेसन मिक्स करून घ्यावे
खोबरं घालावं
सगळं भाजून घ्यावे
गार झाल्यावर त्यात पिठीसाखर व जायफळ पूड घालावी, चांगले मळावे
पिठाची व सारणाची consistancy सारखी असावी.
दोन लाट्या पिठाच्या व एक सारणाची असे घ्यावे. दोन पीठांच्या लाट्यात एक सारणाची लाटी घालून
सगळीकडून बंद करावे
मग हलक्या हाताने तांदळाच्या पिठावर लाटून घ्यावे
मग तव्यावर मंद गॅसवर तूप सोडून भाजावे
पोळी तयार आहे
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा