आंबा मोदक | Mango modak Recipe in Marathi

प्रेषक Manisha Sanjay  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango modak recipe in Marathi,आंबा मोदक, Manisha Sanjay
आंबा मोदकby Manisha Sanjay
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

आंबा मोदक recipe

आंबा मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango modak Recipe in Marathi )

 • आंबा गर - १५० ग्राम +१ वाटी
 • गुळ - १०० ग्राम
 • खिसलेले ओले खोबरे - १५० ग्राम
 • तूप - १/२ टीस्पून +१/२ टीस्पून
 • वेलची पावडर - १/२ टीस्पून
 • तांदूळ पीठ - २ वाटी
 • पाणी - १ वाटी
 • साखर - १ टेबलस्पून
 • मीठ - १/२ टीस्पून

आंबा मोदक | How to make Mango modak Recipe in Marathi

 1. जाड बुडाच्या पातेल्यात पाणी, १ वाटी आंबा गर, साखर, १ टीस्पून तूप , मीठ टाकून उकळायला ठेवा.
 2. उकळी आली की गॅस बारीक करून त्यात पीठ टाकून चांगले मिक्स करून घ्या. झाकण ठेवून १ वाफ येऊ द्या. झाकण उघडून परत एकदा मिक्स करून गॅस बंद करा. झाकण ठेवून पातेले बाजूला ठेवून द्या.
 3. कढई मध्ये आंबा गर, खोबरे, गुळ, तूप मिक्स करून घ्या. गॅस चालू करून मिश्रण घट्ट होई पर्यंत शिजवून घ्या.
 4. मिश्रण एका वाटीत काढून थंड करण्यासाठी ठेवून द्या.
 5. उकडलेले पीठ चांगले मळून घ्या. त्याची पारी बनवा, खोबऱ्याचे सारण भरून मोदक बनवून घ्या.
 6. ईडली पात्र किंवा स्टीमर मध्ये मोदक १० मिनिटे वाफवून घ्या.
 7. वाफव लेले मोदक ताटात काढून घ्या. वरून तूप घालून खायला द्या.

Reviews for Mango modak Recipe in Marathi (0)