मुख्यपृष्ठ / पाककृती / फोडशीची भजी

Photo of Fodashi Leaves Pakora by Sujata Hande-Parab at BetterButter
499
5
0.0(0)
0

फोडशीची भजी

Jul-15-2018
Sujata Hande-Parab
25 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फोडशीची भजी कृती बद्दल

फोडशी किंवा कुलू ची भाजी महाराष्ट्रा मध्ये पावसाळ्यात मुबलक आदळते. हि गावठी भाजी सगळीकडे विविध प्रकारे केली जाते आणि मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाते. मी हि भाजी, कांदा, बेसन आणि काही मसाले वापरून भजी बनवलेली आहे. फोडशी ची भाजी आणल्यानंतर तिच्या पाती वेगळ्या करून घ्याव्यात. मध्ये सफेद जाड दांडी असेल तर ती हि काढावी. व्यवस्तिथ पाण्यात ३-४ वेळा धुवून काढावी आणि नंतरच तिचा वापर करावा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. फोडशीची पाने – १ १/२ कप बारीक कापलेली
  2. बेसन – १/२ -३/४ कप 
  3. कांदा – १ मध्यम उभा पातळ चिरून घेतलेला  
  4. लाल मिरची पावडर – १/२ टीस्पून 
  5. गरम मसाला – 1 टीस्पून
  6. हिंग - १/४ टीस्पून
  7. जिरे १/२ टीस्पून
  8. तेल तळण्यासाठी - २ कप
  9. मीठ चवीनुसार 

सूचना

  1. फोडशीची पाने आणि कांदा एका वाडग्यात घेऊन मीठ टाकावे. चांगले चुरून घेऊन झाकण करून १५-२० मिनिटांसाठी बाजूला ठेवावे. ह्याने भजीच्या मिश्रणाला पाणी सुटते. वेगळे पाणी टाकायची गरज लागत नाही.
  2. त्यात गरम मसाला, हिंग, लाल तिखट, जिरे टाकून व्यवस्तीत एकत्र करावे.
  3. हळू हळू बेसन टाकून एकजीव करून घ्यावे. जर बेसन आणखीन लागत असेल तर टाकावे.
  4. एका कढईत तेल तापवावे. आंच कमी मध्यम ठेवावी. हळू हळू भजीचे मिश्रण थोडे थोडे करून तेलात सोडावे. तेल खूप गरम नसावे. नाही तर भजी आतून कच्च्या आणि बाहेरून करपतील.
  5. सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत कमी - मध्यम ज्योती वर तळून घ्या.
  6. गरमा गरम टोमॅटो सौस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर