आंबोळ्या | Ambolya Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  16th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Ambolya recipe in Marathi,आंबोळ्या, Deepa Gad
आंबोळ्याby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  24

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

3

0

आंबोळ्या recipe

आंबोळ्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Ambolya Recipe in Marathi )

 • जाडे तांदूळ १ वाटी
 • उकडे तांदूळ २ वाट्या
 • उडीद डाळ दीड वाट्या
 • २ च चणाडाळ
 • १ च मेथी

आंबोळ्या | How to make Ambolya Recipe in Marathi

 1. तांदूळ, डाळी, मेथी वेगवेगळी पाण्यात दिवसभर भिजत ठेवा
 2. रात्री सर्व वाटून घ्या. मध्यम ठेवा म्हणजे जास्त पातळ नको की घट्ट नको
 3. मीठ घालून एकजीव करून झाकून ठेवा
 4. सकाळी पीठ फुगून येईल
 5. बीडाचा तवा घेऊन त्यावर तेल लावून बॅटर घालून जाडसर पसरा
 6. झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवा नंतर पलटून भाजा
 7. चहाबरोबर, चटणीबरोबर, चिकनबरोबर किंवा काळ्या ब वाटाण्याच्या सांबारबरोबर खाऊ शकता
 8. ही खास मालवणी रेसिपी आहे मस्त मऊ भुुसभूषित होतात ह्या आंबोळ्या

My Tip:

ह्या आंबोळ्या बीडाच्या तव्यावरच्याच छान होतात. तसेच यात उकडे तांदूळ घातल्यामुळे स्पॉंजि होतात

Reviews for Ambolya Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo