Photo of Gulabjam by Bhavna Mhatre at BetterButter
676
1
0.0(0)
0

गुलाबजाम

Jul-16-2018
Bhavna Mhatre
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुलाबजाम कृती बद्दल

गुलाबजाम

रेसपी टैग

  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 10

  1. २५० ग्राम गुलाबजाम खवा
  2. 1 टेस्पून मैदा
  3. दिड कप साखर
  4. 2 कप पाणी
  5. १/२ टिस्पून वेलचीपावडर
  6. तळण्यासाठी तेल किंवा तूप
  7. चिमूटभर बेकिंग सोडा

सूचना

  1. १) खव्याचा गोळा बारीक किसणीवर किसून घ्यावा. यात मैदा आणि अगदी किंचीत बेकिंग सोडा घालावा. निट मिक्स करावे. डब्यात गोळा 15-20 मिनिटे झाकून ठेवावा.
  2. 2) दिड कप साखर, 2 कप पाणी एकत्र करून उकळत ठेवावे. एकतारी पाक करून घ्यावा. वेलचीपूड घालावी. पाक तयार करावे.
  3. 3) मळलेल्या गोळ्याचे दिड ते दोन सेमीचे गोळे बनवावे. गोळ्यांना चिर असू नये त्यामुळे तेलात टाकल्यावर गुलाबजाम फुटतात.
  4. 4) तेल व्यवस्थित गरम करून आच मध्यम (मिडीयम लो) करावी. तेलाचे तापमान तपासण्यासाठी प्रथम एक गोळा टाकावा. जर गोळा लगेच वर तरंगला तर तेल जास्त तापले आहे असे समजावे. आधी गोळा तळाला जाऊन काही सेकंदांनी तेलावर तरंगला पाहिजे. म्हणजे तेलाचे तापमान बरोबर आहे असे समजावे. मग आता जास्त गोळे तळणास सोडावेत. हे तरंगलेले गोळे अलगदपणे झार्‍याने गोलगोल हलवावे म्हणजे सर्व बाजूंनी एकसारखा रंग येईल. तसेच तळताना गुलाबजामवर तेल उडवावे म्हणजे निट तळले जातील. लालसर रंग आला कि तळलेले गोळे तेलातून बाहेर काढावे.
  5. 5) गुलाबजाम गरम पाकात सोडावे. पाक एकदम उकळता गरम असू नये तसेच कोमटही नसावा. गुलाबजाम पाकात किमान ५ ते ६ तास मुरवावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर