अळू वडी | Alu vadi Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  16th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Alu vadi by Rohini Rathi at BetterButter
अळू वडीby Rohini Rathi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

अळू वडी recipe

अळू वडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Alu vadi Recipe in Marathi )

 • अळूची पाने 12
 • बेसन पीठ दोन कप
 • लसणाची पेस्ट एक टेबल्स्पून
 • लाल मिरची पावडर एक टिस्पून
 • धने या जिरा पावडर एक टी स्पून
 • हिरवी मिरची एक टिस्पून
 • चिंचेचा कोळ दोन टेबल्स्पून
 • गुळ एकटेबल स्पून
 • तेल मोहनासाठी
 • मीठ चवीनुसार
 • तेल वडी तळण्यासाठी

अळू वडी | How to make Alu vadi Recipe in Marathi

 1. आळूची पाने धुवून त्यांची डेट कापून घ्यावी
 2. बाकीचे सर्व सामग्री एकत्र करून घट्ट पेस्ट बनवून घ्यावी
 3. अळूचा एक पान घेऊन उलटा ठेवून त्यावर ती तयार पेस्ट सर्व बाजूने लावून घ्यावी
 4. त्याच पानावर दुसरे पान ठेवून पेस्ट लावून घ्यावी
 5. अशाप्रकारे अजून दोन पाने ठेवून चार पानांचा रोल बनवून घ्यावा
 6. उरलेल्या सर्व पानांचे चार-चार करून रोल बनवून घ्यावे
 7. एका भांड्यात पाणी उकडून त्यावर ती एक चाळणी ठेवावी
 8. चाळणीमध्ये तयार रोल ठेवून व झाकून 15 ते 20 मिनिटे वाफवून घ्यावे
 9. थंड झाल्यानंतर अंदाजे अर्धा इंच याप्रकारे स्लाईस कापून घ्याव्या
 10. कढईमध्ये तेल गरम करून अळू वड्या तळून घ्याव्यात
 11. अशाप्रकारे तयार अळूवड्या थंड करून लंच बॉक्समध्ये द्याव्यात

My Tip:

तळण्याऐवजी वड्या शालो फ्राय केल्या तरीही स्वादिष्ट लागतात

Reviews for Alu vadi Recipe in Marathi (0)