हेल्दी पनीर फ्रैंकी | Healthy Paneer Franki Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  16th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Healthy Paneer Franki recipe in Marathi,हेल्दी पनीर फ्रैंकी, Archana Chaudhari
हेल्दी पनीर फ्रैंकीby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

हेल्दी पनीर फ्रैंकी recipe

हेल्दी पनीर फ्रैंकी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Healthy Paneer Franki Recipe in Marathi )

 • पनीर २ वाटया कुस्करून घेतलेले
 • हिरव्या मिरच्या २
 • कांद्याची पात १ १/२ वाटी बरीक कापुन घेतलेली
 • लिंबाचा रस १ टीस्पून
 • किचन किंग मसाला २ टीस्पून
 • लाल तिखट १ टीस्पून
 • हळद १ टीस्पून
 • मीठ चवीनुसार
 • तूप १ टेबलस्पून
 • गव्हाच्या पिठाची भिजवलेली कणिक १ वाटी
 • तूप वरून लावायला
 • गाजर १/२ वाटी लांब कापलेले
 • काकडी १/२ वाटी लांब कापलेली
 • कांदा १/२ उभा चिरलेला

हेल्दी पनीर फ्रैंकी | How to make Healthy Paneer Franki Recipe in Marathi

 1. एका मोठ्या भांड्यात कुस्करलेलं पनीर, कांदा पात, लिंबू रस,किचन किंग मसाला,तिखट,मीठ,हिरवी मिरची, हळद एकत्र करून छान एकजीव करून घ्या
 2. पॅन मध्ये तूप टाकून पनीर चे मिश्रण १० मिनिटे मध्यम आचेवर गरम करून घ्या.
 3. आता तयार कणकेच्या तूप लावून पोळ्या करून घ्या.
 4. एका ताटात पोळी ठेवा.
 5. वरील पोळीवर आधी पनीर चे मिश्रण पसरवा नंतर गाजर,काकडी,कांदा टाका.
 6. चांगले घट्ट गुंडाळून घ्या.फ्रॅंकी तयार आहे.
 7. मी दोन्ही बाजूंना कापते जेणेकरून पोळीच्या कडा कापल्या जातील.
 8. आता बटर पेपर मध्ये गुंडाळून डब्यात टोमॅटो केचप सोबत पॅक करा :blush:

My Tip:

आवडीच्या भाज्या टाकू शकता.पनीर खूप जास्त शिजवू नका.

Reviews for Healthy Paneer Franki Recipe in Marathi (0)