ग्रीन मसाला गवार भाजी | Green gravy Cluster Beans Recipe in Marathi

प्रेषक Deepasha Pendurkar  |  17th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Green gravy Cluster Beans recipe in Marathi,ग्रीन मसाला गवार भाजी, Deepasha Pendurkar
ग्रीन मसाला गवार भाजीby Deepasha Pendurkar
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

ग्रीन मसाला गवार भाजी recipe

ग्रीन मसाला गवार भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Green gravy Cluster Beans Recipe in Marathi )

 • पाव किलो गवार तुकडे करून
 • अर्धा वाटी आले खोबरे
 • 3 किंवा 4 हिरव्या मिरच्या
 • कोथिंबीर अर्धा वाटी
 • लसूण पाकळ्या 5
 • कांदा 1
 • मीठ तेल

ग्रीन मसाला गवार भाजी | How to make Green gravy Cluster Beans Recipe in Marathi

 1. लसूण खोबर कोथिंबीर मिरची वाटून घ्या
 2. फोडणीला राई टाकून तडतडू द्या
 3. कांदा टाका आणि गुलाबी परतून घ्या
 4. गवार आणि वाटलेला मसाला घाला आणि चांगले परतून घ्या
 5. 2 चमचे पाणी घाला आणि मंद गॅस वरती झाकण लावून शिजू द्या
 6. मध्ये मध्ये परतत राहा
 7. सुखे वाटले तर पुन्हा थोडे पाणी घाला
 8. शिजल्या वरती मीठ घाला
 9. थंड झाली भाजी की टिफिन मध्ये भरा

My Tip:

या भाजीत तेल थोडे जास्त ठेवा तिखट पणाला मिरचीचे प्रमाण आपल्या आवडी नुसार ठेवा रस हवा असेल तर पाणी थोडे जास्त घाला

Reviews for Green gravy Cluster Beans Recipe in Marathi (0)