मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला मटकी

Photo of Spicy mataki by Smita Koshti at BetterButter
546
3
0.0(0)
0

मसाला मटकी

Jul-17-2018
Smita Koshti
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला मटकी कृती बद्दल

ही कांदा लसूण मसाल्याची कोरडी भाजी आहे. फ्रिजमधे कांदा पेस्ट, आलं लसूण पेस्ट, मिरची पेस्ट असे तयार करून ठेवले असले तर आयत्या वेळी वापरता येते,वेळ व मेहनतही वाचते. सकाळच्या गडबडीत डबा झटपट तयार होतो. आणि पोटभरीचा पौष्टिक डबा तयार.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 चमचे कांदा पेस्ट
  2. 1चमचे आलं लसूण पेस्ट
  3. 2 चमचे खोबरे पेस्ट
  4. 1/2 चमचा हळद
  5. 2 चमचे कश्मिरी मिरची पेस्ट ( पावडर)
  6. 1 चमचा धने पूड
  7. फोडणी साठी जीरे, मोहरी, हिंग
  8. मीठ चवीनुसार
  9. फोडणी साठी तेल
  10. चिमूटभर गरम मसाला
  11. 1 वाटी मोड आलेली मटकी
  12. बारीक चिरून कोथिंबीर
  13. पोळी साठी नेहमीप्रमाणे सामान कणीक, मीठ, तेल

सूचना

  1. कणीक मळून घ्यावी.
  2. कढईत तेल गरम करुन क्रमाने मोहरी, जीरे, हिंग, कांदा पेस्ट घालून चांगले परतून घ्या
  3. लगेच आलं लसूण पेस्ट घालून परतवा
  4. नंतर खोबरे पूड किंवा पेस्ट,धनेपूड, हळद, मिरची पावडर (पेस्ट) घालून चांगले तळून घ्या तेल सुटेपर्यंत.
  5. हे सर्व तळत असताना बाजूला पोळ्या लाटून तव्यावर भाजून घ्या
  6. भाजीत थोडा गरम मसाला घालून मटकी व मीठ घालून चांगले परतून घ्या व झाकण ठेवून वाफ आणावी.
  7. कोथिंबीर घालून परतून घ्या व भरा डबा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर