दोडक्याची मसूर दाळ घातलेली भाजी | Ridge gaurd with lentil pulse. Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  17th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Ridge gaurd with lentil pulse. recipe in Marathi,दोडक्याची मसूर दाळ घातलेली भाजी, Archana Chaudhari
दोडक्याची मसूर दाळ घातलेली भाजीby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

2

0

दोडक्याची मसूर दाळ घातलेली भाजी recipe

दोडक्याची मसूर दाळ घातलेली भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Ridge gaurd with lentil pulse. Recipe in Marathi )

 • दोडके ४ मोठे (साधारण ४ वाट्या बारीक कापून घेतलेला)
 • मसूर डाळ ३/४ वाटी
 • कांदा १ मध्यम ( बारीक चिरलेला)
 • हिरव्या मिरच्या ६ ( मधून १ चीर दिलेल्या)
 • लसूण ७ पाकळ्या (जाडसर कुटून)
 • तेल २ टेबलस्पून
 • जिरे १/२ टीस्पून
 • मोहरी १/२ टीस्पून
 • हळद २ टीस्पून
 • मीठ चवीनुसार

दोडक्याची मसूर दाळ घातलेली भाजी | How to make Ridge gaurd with lentil pulse. Recipe in Marathi

 1. कढईत तेल तापवून, त्यात जिरे,मोहरी टाका.
 2. लसूण ,मिरची टाका,कांदा टाकून परतवून घ्या.
 3. एका भांड्यात धुतलेली मसूर डाळ अर्धवट शिजवून घ्या.
 4. कांदा थोडा सोनेरी झाला की कापलेला दोडका टाका. मीठ टाका.
 5. झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजू द्या.
 6. दोडक्याचे सगळे पाणी आटू द्या.
 7. आता दोडक्यामध्ये अर्धवट शिजलेली मसूर डाळ टाका.
 8. मीठ लागत असेल तर टाका.(आधी आपण शिजतांना टाकले आहे)
 9. दोडक्याची भाजी मोठया आचेवर ५ मिनिटे ठेवा,मध्ये हालवत रहा.
 10. दोडक्याची मसूर टाकलेली भाजी तयार आहे.

My Tip:

तुम्ही इतर डाळी टाकू शकता.

Reviews for Ridge gaurd with lentil pulse. Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo