मुख्यपृष्ठ / पाककृती / दोडक्याची मसूर दाळ घातलेली भाजी

Photo of Ridge gaurd with lentil pulse. by Archana Chaudhari at BetterButter
0
1
0(0)
0

दोडक्याची मसूर दाळ घातलेली भाजी

Jul-17-2018
Archana Chaudhari
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दोडक्याची मसूर दाळ घातलेली भाजी कृती बद्दल

डब्यात लंच साठी उत्तम.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. दोडके ४ मोठे (साधारण ४ वाट्या बारीक कापून घेतलेला)
  2. मसूर डाळ ३/४ वाटी
  3. कांदा १ मध्यम ( बारीक चिरलेला)
  4. हिरव्या मिरच्या ६ ( मधून १ चीर दिलेल्या)
  5. लसूण ७ पाकळ्या (जाडसर कुटून)
  6. तेल २ टेबलस्पून
  7. जिरे १/२ टीस्पून
  8. मोहरी १/२ टीस्पून
  9. हळद २ टीस्पून
  10. मीठ चवीनुसार

सूचना

  1. कढईत तेल तापवून, त्यात जिरे,मोहरी टाका.
  2. लसूण ,मिरची टाका,कांदा टाकून परतवून घ्या.
  3. एका भांड्यात धुतलेली मसूर डाळ अर्धवट शिजवून घ्या.
  4. कांदा थोडा सोनेरी झाला की कापलेला दोडका टाका. मीठ टाका.
  5. झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजू द्या.
  6. दोडक्याचे सगळे पाणी आटू द्या.
  7. आता दोडक्यामध्ये अर्धवट शिजलेली मसूर डाळ टाका.
  8. मीठ लागत असेल तर टाका.(आधी आपण शिजतांना टाकले आहे)
  9. दोडक्याची भाजी मोठया आचेवर ५ मिनिटे ठेवा,मध्ये हालवत रहा.
  10. दोडक्याची मसूर टाकलेली भाजी तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर