Photo of Carrot Ghavan by Sujata Hande-Parab at BetterButter
1104
4
0.0(0)
0

गाजर घावन

Jul-18-2018
Sujata Hande-Parab
495 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर घावन कृती बद्दल

घावन हि एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन डिश आहे. ती महाराष्ट्र आणि गोव्यात मोठ्या आवडीने खाल्ली जाते. दक्षिणे कडे हि डिश नीर डोसा ह्या नावाने प्रचलित आहे त्यात फक्त किसलेले ओले खोबरे घालून ते बनवले जाते. कोकणात तांदूळ किंवा तांदळाची कणी धुवून ती सुखवून थोडे जाडसर पीठ दळून आणून ठेवून दिले जाते आणि जेव्हा घावन बनवायचे असेल तेव्हा पटकन हे पीठ वापरले जाते. मी ह्या रेसिपीत गाजराचा वापर केलेला आहे. अतिशय स्वादिष्ट आणि सकाळचा नास्ता असो, दुपारचे किंवा रात्रीचे जेवण; घावन हा एक अतिशय उत्तम पर्याय आहे. टिफिन साठी हि अगदी हेलथी, पटकन होणारा आणि अनेक प्रकारे बनवता येणारा असा पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • व्हिस्कीन्ग
  • ब्लेंडींग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. इडली किंवा डोसा तांदूळ - २ कप
  2. मेथीचे दाणे - १ टेबलस्पून
  3. किसलेला गाजर - ३/४ – १ कप
  4. चवीनुसार मीठ
  5. पाणी - 2-3 कप रात्रभर भिजवण्यासाठी , मिश्रणासाठी १ - ३/४ कप
  6. तेल - 3-4 टेबलस्पून
  7. सर्विंग - नारळाची चटणी, टोमॅटो चटनी, चहा, कॉफी

सूचना

  1. तांदूळ आणि मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी पाणी काढून टाका आणि मिक्सर ला बारीक वाटून घ्या. वाटताना ३/४ भाग किसलेला गाजर घाला.
  2. मीठ, राहिलेला १/४ भाग किसलेला गाजर आणि पाणी घालून चांगले ढवळून घ्या. मिश्रण फार जाड किंवा अतिशय पातळ असू नये.
  3. नॉनस्टीक पॅन वर तेल पसरवून घ्यावे. एका गोल चमच्याने बनवलेले तांदूळ गाजराचे मिश्रण
  4. व्यवस्तिथ गोलाकार रितीने पॅनवर पसरवून घ्या. 4-5 सेकंद पॅनवर ताट ठेवावे. प्लेट काढून घ्या आणि डोसा पॅनच्या कडा सोडू लागल्यावर परतून घ्या. वर थोडे तेल शिंपडा आणि दुसऱ्या बाजूने भाजून घ्या.
  5. नारळ चटणी किंवा मसालेदार टोमॅटो चटणीबरोबर किंवा चहा, कॉफी बरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर