मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदा बटाटा पोहे

Photo of Kanda Batata Poha by Sujata Hande-Parab at BetterButter
1854
4
0.0(0)
0

कांदा बटाटा पोहे

Jul-18-2018
Sujata Hande-Parab
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा बटाटा पोहे कृती बद्दल

कांदा पोहे हि महाराष्ट्राची पारंपरिक डिश आहे. सकाळची न्याहारी किंवा संध्याकाळचा स्नॅक्स पोहे हे सगळीकडे आवडीने खाल्ले जातात. मुलांना डब्यात देण्यासाठी असतीशय उत्तम पर्याय आहे पटकन होणारी आणि अतिशय पौस्टिक अशी हि डिश थोड्याश्या लिंबाच्या रसाने आणि शेव टाकून खूपच लज्जतदार लागते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पोहा - 1 1/2 कप (पूर्णपणे धुऊन आणि गाळून घ्यावे.)
  2. उकडलेले आणि मध्यम किंवा बारीक तुकडे केलेले बटाटे - २ छोटे किंवा १ मोठा
  3. मोहोरी - 1/2 टीस्पून
  4. जिरे - 1/2 टीस्पून
  5. कढीपत्ता - 4-५ पाने
  6. कांदा मध्यम - 1 बारीक चिरून
  7. हिरव्या मिरच्या - 2 बारीक चिरून
  8. बारीक चिरलेली कोथिंबीर पाने - 1 1/2 टेबलस्पून 
  9. हळद पावडर - 1/2 टिस्पून
  10. साखर - 1 टेबलस्पून 
  11. तेल - 1 टेबलस्पून 
  12. भाजलेले शेंगदाणे - 1 1/2 टेबलस्पून 
  13. ताजे किसलेला नारळ - 1/2 टेबलस्पून (पर्यायी)
  14. चवीनुसार मीठ
  15. सर्व्हिंगसाठी - बारीक शेव् लिंबू तुकडे , बारीक चिरलेला कांदा

सूचना

  1. एक कढई किंवा नॉनस्टिक्स पॅन मध्ये तेल गरम करून मोहरी आणि जिरे घाला. त्याला तडतडू द्या कढीपत्ता आणि चिरलेला कांदा घालावा. पारदर्शक होईपर्यंत शिजवा.
  2. बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेल्या कोथिंबीर पाने टाका. 1 मिनिट शिजू द्या.
  3. हळद, साखर घाला. साखर विरघळे पर्यंत चांगले मिक्स करावे.
  4. उकडून बारीक केलेले बटाट्याचे तुकडे घालावे आणि मिक्स करावे.
  5. धुतलेले आणि गाळून घेतलेले पोहे घाला. हलक्या हाताने मिक्स करावे किंवा ते टॉस करा
  6. भाजलेले कुटलेले शेंगदाणे आणि किसलेले नारळ घाला. हलक्या हाताने मिक्स करावे.
  7. कोणतीही मसालेदार किंवा फ्लेवर्स शेव् घाला
  8. बारीक चिरलेला कांदा घाला.
  9. लिंबू तुकडे आणि चहा किंवा कॉफी बरोबर गरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर