Photo of Pulav by deepali oak at BetterButter
965
4
0.0(0)
0

पुलाव

Jul-18-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुलाव कृती बद्दल

डब्यात नेहमी पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल त्यांच्यासाठी पटकन होणार पदार्थ.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बासमती किंवा कुठलाही तांदूळ ३ लहान वाटी
  2. गाजर लांब चीरून १
  3. मटार किंवा वटाणे अर्धीवाटी
  4. बटाटा ऊभा चीरून १ लहान
  5. फरसबी लांब चीरून ३/४शेंगा
  6. तोंडली लांब चीरून ५/६
  7. काळीमीरे ३/४
  8. लवंग ३/४
  9. तमालपत्र ३/४
  10. दालचीनी १
  11. आले लसुण मीरची पेस्ट १ चमचा
  12. लिंबू रस १ चमचा
  13. जीरे
  14. मीठ
  15. पाणी
  16. तुप किंवा तेल
  17. काजु व मनुका ऐच्छिक

सूचना

  1. तांदुळ धुवून निथळत ठेवा
  2. कुकरला तुप गरम करा
  3. त्यात जीरे,आले लसुण मीरची पेस्ट घाला
  4. काळीमीरी,लवंग,तमालपत्र,दालचीनी घाला
  5. आता सर्व भाज्या घाला
  6. तांदूळ घालून परता व मीठ घाला
  7. लींबुरस व कोथिंबीर घाला
  8. काजु व मनुका तुपावर परतुन घाला (ऐच्छिक)
  9. आता तुमचा तांदूळ कसा आहे त्यावर ठरवुन गरम पाणी घाला
  10. कुकरला दोन शिटया द्या व जरा वेळ गॅस बारीक करून ४/५ मीनीट ठेवा
  11. गरम गरम दाल तडका किंवा भाजी सोबत डब्यात द‍या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर