इडली सांबार- चटणी | Idali sambar chutney Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  18th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Idali sambar chutney recipe in Marathi,इडली सांबार- चटणी, Manasvi Pawar
इडली सांबार- चटणीby Manasvi Pawar
 • तयारी साठी वेळ

  13

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

इडली सांबार- चटणी recipe

इडली सांबार- चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Idali sambar chutney Recipe in Marathi )

 • इडली साठी साहित्य
 • दोन वाट्या तांदूळ
 • एक वाटी उडीद डाळ
 • एक चमचा मेथी दाणे
 • सांबार साहित्य
 • एक वाटी तुरडाळ
 • सांबार मसाला दोन चमचे
 • दोन कांदे उभे पातळ कापले
 • दोन टोमॅटो उभे चिरून
 • दोन् हिरव्या मिरच्या चिरून
 • चिंचेचा कोळ आवडीनुसार कमी-जास्त
 • तेल फोडणीसाठी
 • एक छोटा चमचा हळद
 • थोडे लाल तिखट
 • हिंग
 • मोहरी
 • एक चमचा मेथी दाणे
 • कढीपत्ता
 • चार लाल सुक्या मिरच्या
 • चटणी साहित्य
 • एक वाटी ओले खोबरे
 • २/३ हिरव्या मिरच्या
 • कोथिंबीर
 • मीठ

इडली सांबार- चटणी | How to make Idali sambar chutney Recipe in Marathi

 1. तांदूळ आणि उडीद डाळ धुवून वेगवेगळ्या भांड्यात चार तास भिजत ठेवावा
 2. डाळीमधे एक चमचा मेथी दाणे घालावेत
 3. चार तासांनंतर डाळ आणि तांदूळ वाटून घ्यावे व एकत्र करून पीठ आंबवण्यासाठी आठ तास ठेवून द्यावे
 4. इडली करताना पीठामधे थोडं मीठ आणि तेल घालून गरज असल्यास पाणी घालावे
 5. इडली पात्राला एक एक थेंब तेल लावून त्यामध्ये इडली मिश्रण घालून १५ मिनिटे इडल्या वाफवाव्यात
 6. थोड्या थंड झाल्यावर इडल्या काढाव्यात व्यवस्थित निघतात
 7. चटणी चे साहित्य सगळे एकत्रित करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
 8. सांबार साठी तुरडाळ शिजवून घ्या
 9. आता एका भांड्यात तेल घालून फोडणी चे साहित्य म्हणजे मेथीदाणे हिंग कढीपत्ता मोहरी सुक्या व हिरव्या मिरच्या घालून परतावे
 10. आता उभा चिरलेला कांदा टोमॅटो घालून एक वाफ काढावी हळद थोडं लाल तिखट आणि सांबार मसाला घालून त्यावर घोटलेली डाळ घालावी
 11. चिंचेचा कोळ घालून एक दोन उकळ्या काढाव्यात

My Tip:

आवडीप्रमाणे यामध्ये शेवग्याच्या शेंगा व भोपळा घालू शकता

Reviews for Idali sambar chutney Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo