रवा डोसा | Rava dosa Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  18th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Rava dosa by Rohini Rathi at BetterButter
रवा डोसाby Rohini Rathi
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

5

0

रवा डोसा recipe

रवा डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rava dosa Recipe in Marathi )

  • एक कप रवा
  • दोन टेबल्स्पून तांदूळ पीठ
  • अर्धा कप दही
  • अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर
  • दोन हिरव्या मिरच्या
  • मीठ चवीनुसार
  • तेल डोसा भाजण्यासाठी

रवा डोसा | How to make Rava dosa Recipe in Marathi

  1. सर्वप्रथम बारीक चिरलेली कोथिंबीर हिरवी मिरची व दही मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे
  2. एका बाउल मध्ये रवा तांदळाचे पीठ व मीठ एकत्र करून घ्यावे
  3. एकत्र केलेल्या मिश्रणात दही व कोथिंबिरीचे मिश्रण घालून एकजीव करून घ्यावे
  4. नॉनस्टिक पॅन गरम करून तेल लावावे
  5. चमचा च्या साह्याने बेटर गरम तव्यावर टाकावे
  6. बेटर पसरवण्याची गरज नाही
  7. साईडने तेल सोडून डोसा गुलाबीसर रंग येईपर्यंत भाजून घ्यावा
  8. दोन्ही साईडने भाजून घ्यावा
  9. अशाप्रकारे तयार डोसा टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करावा

My Tip:

बेटर पसरण्याची गरज नाही आपोआपच पॅनमध्ये बटर पसरली जाते

Reviews for Rava dosa Recipe in Marathi (0)