रोज ड्रायफ्रुट केक | Rose Dry Fruit Cake Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  18th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Rose Dry Fruit Cake recipe in Marathi,रोज ड्रायफ्रुट केक, samina shaikh
रोज ड्रायफ्रुट केकby samina shaikh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

1

0

रोज ड्रायफ्रुट केक recipe

रोज ड्रायफ्रुट केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rose Dry Fruit Cake Recipe in Marathi )

 • 2वाटी मैदा(चाळून)
 • अडीच वाटी साखर(बारीक पुड)
 • 2चमचे रोज ईसेन्स(कमी जास्त ही करू शकता )
 • 4चमचे बेकीग पावडर(चाळून)
 • 2चमचे कोको पावडर(चाळून)
 • 1वाटी अमूल बटर
 • ड्रायफ्रुट (आवडीनुसार)
 • अर्धी वाटी टूटी फ्रुटि
 • गुलाब पाकळ्या (सजावटी साठी)
 • 5अंडी
 • ब्राउन पेपर
 • 1छोटी डेरी मिल्क चॉकलेट

रोज ड्रायफ्रुट केक | How to make Rose Dry Fruit Cake Recipe in Marathi

 1. एका पातेल्याला आतून बटर मैदा व ब्राउन पेपर लावून ग्रीसीग करुन घ्या
 2. मिक्सरमध्ये बटर घालून फिरवून घ्या
 3. मग एक अंडे व 1चमचा मैदा घालून फिरवून घ्या
 4. अंडे मैदा घालून 5वेळा फिरवून घ्या
 5. आता साखर बेकीग पावडर रोज इसेंस 5min मिक्सरमधे फिरवून घ्या
 6. या मिश्रनात थोडा थोडा मैदा घालून चमच्या ने एका डायरेक्शन मधे हलक्या हाताने मिश्रण एकजीव करा (गुठळ्या होता कामा नये)
 7. आता ड्रायफ्रुट व टूटीफ्रुटि घाला व थोडे हलक्या हाताने हलवून घ्या
 8. मिश्रण ग्रीसीग केलेल्या पातेल्यात ओतून टँप करा
 9. आता गँस वर मोठे पातेले ठेवा त्यात 1झाकन ठेवा
 10. यात मिश्रण घातलेले पातेले ठेवा व झाकण ठेवून 10min गँस मोठा व 25min slo करुन केक शिजु द्या
 11. मधे मधे झाकन काढून केक चेक करा
 12. टूट पीक किवा सूरि घालून केक चेक करा(टूट पीक /सूरी क्लीण आली की केक शिजला असे समजा)
 13. आता चॉकलेट कोको पावडर व साखर एकत्र करुन छान फेटुन घ्या
 14. केक वर मिश्रण पसरवा
 15. ड्रायफ्रुट टूटीफ्रुटि गुलाब पाकळ्या ने गार्नीश करा

My Tip:

या मधे तुमच्या आवडीचे ईसेन्स घालू शकता

Reviews for Rose Dry Fruit Cake Recipe in Marathi (0)