मुख्यपृष्ठ / पाककृती / रोज ड्रायफ्रुट केक

Photo of Rose Dry Fruit Cake by samina shaikh at BetterButter
0
5
0(0)
0

रोज ड्रायफ्रुट केक

Jul-18-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रोज ड्रायफ्रुट केक कृती बद्दल

ओवन माक्रोवेव बिटर न वापरता अतिशय सोप्या पधतीने घरी तयार केलेला केक

रेसपी टैग

 • नॉन व्हेज
 • कठीण
 • टिफिन रेसिपीज
 • मायक्रोवेवींग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 6

 1. 2वाटी मैदा(चाळून)
 2. अडीच वाटी साखर(बारीक पुड)
 3. 2चमचे रोज ईसेन्स(कमी जास्त ही करू शकता )
 4. 4चमचे बेकीग पावडर(चाळून)
 5. 2चमचे कोको पावडर(चाळून)
 6. 1वाटी अमूल बटर
 7. ड्रायफ्रुट (आवडीनुसार)
 8. अर्धी वाटी टूटी फ्रुटि
 9. गुलाब पाकळ्या (सजावटी साठी)
 10. 5अंडी
 11. ब्राउन पेपर
 12. 1छोटी डेरी मिल्क चॉकलेट

सूचना

 1. एका पातेल्याला आतून बटर मैदा व ब्राउन पेपर लावून ग्रीसीग करुन घ्या
 2. मिक्सरमध्ये बटर घालून फिरवून घ्या
 3. मग एक अंडे व 1चमचा मैदा घालून फिरवून घ्या
 4. अंडे मैदा घालून 5वेळा फिरवून घ्या
 5. आता साखर बेकीग पावडर रोज इसेंस 5min मिक्सरमधे फिरवून घ्या
 6. या मिश्रनात थोडा थोडा मैदा घालून चमच्या ने एका डायरेक्शन मधे हलक्या हाताने मिश्रण एकजीव करा (गुठळ्या होता कामा नये)
 7. आता ड्रायफ्रुट व टूटीफ्रुटि घाला व थोडे हलक्या हाताने हलवून घ्या
 8. मिश्रण ग्रीसीग केलेल्या पातेल्यात ओतून टँप करा
 9. आता गँस वर मोठे पातेले ठेवा त्यात 1झाकन ठेवा
 10. यात मिश्रण घातलेले पातेले ठेवा व झाकण ठेवून 10min गँस मोठा व 25min slo करुन केक शिजु द्या
 11. मधे मधे झाकन काढून केक चेक करा
 12. टूट पीक किवा सूरि घालून केक चेक करा(टूट पीक /सूरी क्लीण आली की केक शिजला असे समजा)
 13. आता चॉकलेट कोको पावडर व साखर एकत्र करुन छान फेटुन घ्या
 14. केक वर मिश्रण पसरवा
 15. ड्रायफ्रुट टूटीफ्रुटि गुलाब पाकळ्या ने गार्नीश करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर