उपमा पराठा | UPAMA paratha Recipe in Marathi

प्रेषक Minal Sardeshpande  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • UPAMA paratha recipe in Marathi,उपमा पराठा, Minal Sardeshpande
उपमा पराठाby Minal Sardeshpande
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

2

0

उपमा पराठा recipe

उपमा पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make UPAMA paratha Recipe in Marathi )

 • एक वाटी रवा
 • दोन कांदे
 • एक वाटी ताक
 • दीड वाटी पाणी
 • दोन वाट्या कणिक
 • तेल तीन टेबलस्पून
 • मोहोरी अर्धा चमचा
 • हळद अर्धा चमचा
 • मीठ
 • साखर एक टीस्पून
 • तीन ओल्या मिरच्या
 • एक टीस्पून आलं पेस्ट
 • एक टीस्पून लसूण पेस्ट
 • पाणी कणिक भिजवायला

उपमा पराठा | How to make UPAMA paratha Recipe in Marathi

 1. रवा कोरडा तांबूस होईपर्यंत भाजा.
 2. बाजूला काढून ठेवा.
 3. कढईत दीड टेबलस्पून तेल तापवा.
 4. मोहोरी घाला.
 5. मिरचीचे तुकडे घाला.
 6. कांदा बारीक चिरून घाला.
 7. परतल्यावर हळद घाला.
 8. आता एक वाटी ताक आणि दीड वाटी पाणी घाला.
 9. चवीनुसार मीठ, साखर घाला.
 10. पाण्याला उकळी आली की त्यात भाजलेला रवा घालून ढवळा.
 11. मंद गॅस वर पाच मिनिटं वाफ येऊ द्या.
 12. उपमा गार होऊ द्या.
 13. नेहमी पोळ्यांची भिजवतो तशीच कणिक भिजवा.
 14. उपमा गार झाला की त्यात आलं लसूण पेस्ट मिक्स करा.
 15. मिरच्यांचे तुकडे काढून टाका.
 16. आता उपम्याचा छोटा गोळा छान मळून घ्या.
 17. कणकेच्या लिंबाएव्हढ्या गोळ्यांची वाटी करून त्यात उपम्याचा गोळा भरा.
 18. सुक्या कणकेवर पराठा लाटा.
 19. तव्यावर तेल सोडून भाजा.
 20. मस्त लुसलुशीत पराठा तयार आहे.

My Tip:

उरलेल्या उपमा किंवा उपिठा पासून घरात कणिक मळलेली असेल तर झटपट पराठा तयार होतो आणि उपमा न खाणारे पण आवडीने खातात.

Reviews for UPAMA paratha Recipe in Marathi (0)