BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / उपमा पराठा

Photo of UPAMA paratha by Minal Sardeshpande at BetterButter
0
3
0(0)
0

उपमा पराठा

Jul-19-2018
Minal Sardeshpande
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपमा पराठा कृती बद्दल

रोजच्या उपम्याला थोडा वेगळा स्वाद आणि सगळे पटापट सम्पवतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. एक वाटी रवा
  2. दोन कांदे
  3. एक वाटी ताक
  4. दीड वाटी पाणी
  5. दोन वाट्या कणिक
  6. तेल तीन टेबलस्पून
  7. मोहोरी अर्धा चमचा
  8. हळद अर्धा चमचा
  9. मीठ
  10. साखर एक टीस्पून
  11. तीन ओल्या मिरच्या
  12. एक टीस्पून आलं पेस्ट
  13. एक टीस्पून लसूण पेस्ट
  14. पाणी कणिक भिजवायला

सूचना

  1. रवा कोरडा तांबूस होईपर्यंत भाजा.
  2. बाजूला काढून ठेवा.
  3. कढईत दीड टेबलस्पून तेल तापवा.
  4. मोहोरी घाला.
  5. मिरचीचे तुकडे घाला.
  6. कांदा बारीक चिरून घाला.
  7. परतल्यावर हळद घाला.
  8. आता एक वाटी ताक आणि दीड वाटी पाणी घाला.
  9. चवीनुसार मीठ, साखर घाला.
  10. पाण्याला उकळी आली की त्यात भाजलेला रवा घालून ढवळा.
  11. मंद गॅस वर पाच मिनिटं वाफ येऊ द्या.
  12. उपमा गार होऊ द्या.
  13. नेहमी पोळ्यांची भिजवतो तशीच कणिक भिजवा.
  14. उपमा गार झाला की त्यात आलं लसूण पेस्ट मिक्स करा.
  15. मिरच्यांचे तुकडे काढून टाका.
  16. आता उपम्याचा छोटा गोळा छान मळून घ्या.
  17. कणकेच्या लिंबाएव्हढ्या गोळ्यांची वाटी करून त्यात उपम्याचा गोळा भरा.
  18. सुक्या कणकेवर पराठा लाटा.
  19. तव्यावर तेल सोडून भाजा.
  20. मस्त लुसलुशीत पराठा तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर