खोबरं खसखस पोळी | KHOBARE khaskhas poli Recipe in Marathi

प्रेषक Minal Sardeshpande  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • KHOBARE khaskhas poli recipe in Marathi,खोबरं खसखस पोळी, Minal Sardeshpande
खोबरं खसखस पोळीby Minal Sardeshpande
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  68

  मि.
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

2

0

खोबरं खसखस पोळी recipe

खोबरं खसखस पोळी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make KHOBARE khaskhas poli Recipe in Marathi )

 • दोन वाट्या ओलं खोबरं
 • अर्धी वाटी खसखस
 • दीड वाटी गूळ
 • एक टीस्पून वेलची पावडर
 • कणिक दोन वाट्या
 • रवा एक वाटी
 • तेल पाव वाटी
 • मीठ
 • लाटायला सुकी कणिक

खोबरं खसखस पोळी | How to make KHOBARE khaskhas poli Recipe in Marathi

 1. खोबरं खवून घ्या.
 2. खसखस भाजून गार होऊ द्या, मिक्सरमध्ये बारीक करा.
 3. दोन वाट्या खोबरं, दीड वाटी गूळ आणि भाजलेली खसखस एका कढईत एकत्र करा.
 4. मंद गॅसवर ढवळत रहा, सारण बनवा.
 5. गार होऊ द्या.
 6. कणिक, रवा एकत्र करून तेल आणि मीठ घालून घट्ट भिजवा.
 7. अर्धा तास झाकून ठेवा.
 8. सारण गार झाल्यावर त्यात वेलची पावडर मिसळून मिक्सरवर बारीक करून घ्या.
 9. पुरणपोळी प्रमाणे कणकेच्या गोळीची वाटी करून त्यात सारणाची गोळी भरा.
 10. कणकेवर लाटून भाजा.
 11. खमंग झटपट पोळी तयार आहे

My Tip:

ही पोळी अजिबात फुटत नाही, पटापट होते आणि चार दिवस सहज टिकते.

Reviews for KHOBARE khaskhas poli Recipe in Marathi (0)