टोमॅटो भाजी आणि खस्ता रोटी | TOMATOBHAJI And Khasta roti Recipe in Marathi

प्रेषक आदिती भावे  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • TOMATOBHAJI And Khasta roti recipe in Marathi,टोमॅटो भाजी आणि खस्ता रोटी, आदिती भावे
टोमॅटो भाजी आणि खस्ता रोटीby आदिती भावे
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

टोमॅटो भाजी आणि खस्ता रोटी recipe

टोमॅटो भाजी आणि खस्ता रोटी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make TOMATOBHAJI And Khasta roti Recipe in Marathi )

 • टोमॅटो -4
 • दाण्याचे कूट 2चमचे
 • तिखट , मिठ आवडीनुसार
 • तेल 1 चमचा
 • गूळ आवडीनुसार
 • Kitchen king मसाला अर्धा चमचा
 • खस्ता रोटी -
 • गहू पीठ- अर्धा कप
 • मैदा - 2 चमचे
 • ओवा पाव चमचा
 • मीठ 1 चमचा
 • तूप 2 चमचे
 • दुध भिजवण्या साठी

टोमॅटो भाजी आणि खस्ता रोटी | How to make TOMATOBHAJI And Khasta roti Recipe in Marathi

 1. टोमॅटो बारीक चिरून घ्यावे तेल गरम करून त्यात मोहरी , हळद घालून फोडणी करून घ्यावी त्यात टोमॅटो घालावे एक वाफ आणावी दाण्याचे कूट , गूळ, मिठ, तिखट, मसाला घालून परतावे एक वाफ काढावी भाजी तयार पटकन होते . गहू पीठ, मैदा, रवा , ओवा, मीठ एकत्र करावे तूप गरम करून यात घालावे पाण्याऐवजी दुध वापरून हे पीठ भिजवावे . रोटी करते वेळी नेहमीच्या पोळी सारखी लाटून त्यात तूप लावून थोडा मैदा भुरभुरावा.मग पोळी लाटून तूप सोडून भाजावी. छान मऊ राहते

My Tip:

भाजीत दुसरा मसाला घालू शकता,

Reviews for TOMATOBHAJI And Khasta roti Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo