उपमा | Upma Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Upma recipe in Marathi,उपमा, Teju Auti
उपमाby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

उपमा recipe

उपमा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upma Recipe in Marathi )

 • 1/२ कप रवा
 • 2 कप पाणी
 • 1 मोठा कांदा
 • 1 टोमँटो
 • फोडणीसाठी : १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जीरे, १/४ टिस्पून हिंग
 • २-३ मिरच्या बारीक चिरुन
 • ३-४ कढिपत्त्याची पाने
 • १ टेस्पून तेल किंवा २ टिस्पून तूप
 • चवीनुसार मीठ

उपमा | How to make Upma Recipe in Marathi

 1. १) सर्वप्रथम रवा व्यवस्थित भाजून घ्यावा.
 2. २) मध्यम आचेवर कढईत तेल/तूप गरम करून त्यात मोहोरी, जीरे, हिंग, घालावी. कढिपत्ता, मिरच्या, घालून फोडणी करावी. चिरलेला कांदा परतून घ्यावा. आवडत असल्यास टोमॅटोच्या ४-६ फोडी घालाव्या.
 3. ३) रवा घालून २-३ मिनिटे मध्यम आचेवर परतावे. दुसर्या शेगडीवर पाणी गरम करत ठेवावे. त्यात आधीच अर्धा चमचा मीठ घालावे. त्यामुळे उपम्याला मीठ व्यवस्थित लागेल.
 4. ४) पाणी चांगले गरम झाले की कढईत घालावे. आणि ढवळून वरून झाकण ठेवावे. १ मिनिटाने उपम्याची चव बघून मीठ adjust करावे. वाफ काढावी.
 5. ५) उपमा तयार झाला कि डिशमध्ये काढावा वरून कोथिंबीर घालावी

My Tip:

१) काही जणांना उपमा अगदी मऊसर लागतो त्याप्रमाणे अर्धा वाटी गरम पाणी जास्त घालावे.

Reviews for Upma Recipe in Marathi (0)