Photo of Upma by Teju Auti at BetterButter
703
6
0.0(0)
0

उपमा

Jul-19-2018
Teju Auti
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपमा कृती बद्दल

झटपट व मस्त

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1/२ कप रवा
  2. 2 कप पाणी
  3. 1 मोठा कांदा
  4. 1 टोमँटो
  5. फोडणीसाठी : १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जीरे, १/४ टिस्पून हिंग
  6. २-३ मिरच्या बारीक चिरुन
  7. ३-४ कढिपत्त्याची पाने
  8. १ टेस्पून तेल किंवा २ टिस्पून तूप
  9. चवीनुसार मीठ

सूचना

  1. १) सर्वप्रथम रवा व्यवस्थित भाजून घ्यावा.
  2. २) मध्यम आचेवर कढईत तेल/तूप गरम करून त्यात मोहोरी, जीरे, हिंग, घालावी. कढिपत्ता, मिरच्या, घालून फोडणी करावी. चिरलेला कांदा परतून घ्यावा. आवडत असल्यास टोमॅटोच्या ४-६ फोडी घालाव्या.
  3. ३) रवा घालून २-३ मिनिटे मध्यम आचेवर परतावे. दुसर्या शेगडीवर पाणी गरम करत ठेवावे. त्यात आधीच अर्धा चमचा मीठ घालावे. त्यामुळे उपम्याला मीठ व्यवस्थित लागेल.
  4. ४) पाणी चांगले गरम झाले की कढईत घालावे. आणि ढवळून वरून झाकण ठेवावे. १ मिनिटाने उपम्याची चव बघून मीठ adjust करावे. वाफ काढावी.
  5. ५) उपमा तयार झाला कि डिशमध्ये काढावा वरून कोथिंबीर घालावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर