नाचोस विथ साल्सा सोस | Nachos with salsa sauce Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Nachos with salsa sauce recipe in Marathi,नाचोस विथ साल्सा सोस, seema Nadkarni
नाचोस विथ साल्सा सोसby seema Nadkarni
 • तयारी साठी वेळ

  60

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

नाचोस विथ साल्सा सोस recipe

नाचोस विथ साल्सा सोस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Nachos with salsa sauce Recipe in Marathi )

 • 2 कप मक्याचे पीठ
 • 1 कप गव्हाचे पीठ
 • 2 चमचा तूप किंवा बटर
 • 1 चमचा लाल तिखट
 • 1/2 चमचा हळद
 • चवी पुरते मीठ
 • 1/2 चमचा काळी मिरी पावडर
 • 1 कप पाणी ( कणीक मळायला)
 • ****** साल्सा सोस साठी :--
 • 4 टोमॅटो
 • 1 कांदा
 • 1-2 हिरव्या मिरच्या
 • 1 जूडी कोथिंबीर ची
 • चवी प्रमाणे मीठ
 • 3-4 लाल सुक्या मिरच्या
 • 2 लिंबू
 • 6-7 लसूण पाकळ्या

नाचोस विथ साल्सा सोस | How to make Nachos with salsa sauce Recipe in Marathi

 1. सवॅ प्रथम एका भांड्यात मक्याचे पीठ, गव्हाचे पिठ, मीठ,लाल तिखट, थोडी हळद व काळे मिरे पावडर घालून एकत्र करावे.
 2. त्यात 2-3 चमचा तूप किंवा बटर घालून मूठ वळेल असे एकत्र करावे.
 3. लागेल तसे पाणी घालून पीठ मळून घ्यावे.
 4. 15-20 मिनिटे झाकून ठेवावे.
 5. तो पर्यंत साल्सा सोस तयार करावा.
 6. एका भांड्यात 2 टोमॅटो, कांदा, मिरची, कोथिंबीर, लसूण पाकळ्या च्या बारीक चिरून एकत्रित करून घ्या
 7. एका पेन मध्ये थोडे तेल घालून 2 टोमॅटो आखे फ्राय करावे.
 8. टोमॅटो फ्राय झाल्यावर त्याच पेन मध्ये लाल सुक्या मिरच्या फ्राय करून घ्या.
 9. थंड करून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
 10. या मिश्रणाला बारीक चिरलेला टोमॅटो च्या मिश्रणात एकत्र करून घ्यावे.
 11. 2 लिंबू चा रस आणि चवीनुसार मीठ घालून एकत्र करून घ्यावे. अशा प्रकारे साल्सा सोस तयार करावा
 12. आता मळलेल्या कणीक चे छोटे छोटे गोळे करून घ्या.
 13. गँस वर कढई ठेवून तेल तापत ठेवावे.
 14. छोट्या गोळ्या ची पातळ पोळी लाटून त्याचे त्रिकोण आकार कापून तेलात तळून घ्या.
 15. अश्या प्रकारे सगळे नाचोस तयार करावे.
 16. डब्यात भरून घ्यावे. आणि साल्सा सोस बरोबर सवॅ करावे. किंवा चीज सोस बरोबर सवॅ करावे.

My Tip:

ह्या पीठा ची कणीक लाटताना थोडा हलक्या हाताने वाटाव्यात. नाहीतर तूटू शकतात.

Reviews for Nachos with salsa sauce Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती