भोपळा बटाटा भाजी | Bottle gourd and potato fry. Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bottle gourd and potato fry. recipe in Marathi,भोपळा बटाटा भाजी, Archana Chaudhari
भोपळा बटाटा भाजीby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

1

0

भोपळा बटाटा भाजी recipe

भोपळा बटाटा भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bottle gourd and potato fry. Recipe in Marathi )

 • पांढरा भोपळा १ मध्यम आकाराचा(साले काढून,कापून छोट्या फोडी केलेल्या)
 • बटाटा १ मध्यम (साल काढून,कापून छोट्या फोडी केलेल्या)
 • जिरे १/२ टीस्पून
 • मोहरी १/२ टीस्पून
 • हिरवी मिरच्या २ बारीक चिरलेल्या
 • कांदा १ मध्यम बारीक चिरून घेतलेला
 • टोमॅटो १ मध्यम बारीक चिरलेला
 • आले लसूण पेस्ट २ टीस्पून
 • तिखट १ टीस्पून
 • हळद २ टीस्पून
 • गरम मसाला १ टीस्पून
 • धणे पावडर १ टीस्पून
 • तेल २ टेबलस्पून
 • मीठ चवीनुसार

भोपळा बटाटा भाजी | How to make Bottle gourd and potato fry. Recipe in Marathi

 1. छोट्या कुकर मध्ये तेल तापायला ठेवा.
 2. जिरे,मोहरी हिरवी मिरची टाका.
 3. बारीक चिरलेला कांदा घालावा, चांगला सोनेरी होईपर्यंत परतवून घ्या.
 4. बारीक चिरलेल टोमॅटो टाका.
 5. तेल वेगळे होईपर्यंत परतवून घ्या.
 6. सगळे सुके मसाले टाका.
 7. भोपळ्याच्या फोडी टाका, बटाट्याच्या फोडी टाका.
 8. मीठ टाका.
 9. १/४ वाटी पाणी टाका.
 10. कुकरचे झाकण लावून २ शिट्या होऊ द्या.
 11. कुकर गार झाल्यावर भाजी एक सर्विग बाउल मध्ये काढून ठेवा.

My Tip:

कोथिंबीर टाका.

Reviews for Bottle gourd and potato fry. Recipe in Marathi (0)