BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / भोपळा बटाटा भाजी

Photo of Bottle gourd and potato fry. by Archana Chaudhari at BetterButter
0
3
0(0)
0

भोपळा बटाटा भाजी

Jul-19-2018
Archana Chaudhari
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भोपळा बटाटा भाजी कृती बद्दल

भोपळा आणि बटाटा खूप छान एकत्रित भाजी लंच बॉक्स साठी मस्त.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • प्रेशर कूक
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. पांढरा भोपळा १ मध्यम आकाराचा(साले काढून,कापून छोट्या फोडी केलेल्या)
  2. बटाटा १ मध्यम (साल काढून,कापून छोट्या फोडी केलेल्या)
  3. जिरे १/२ टीस्पून
  4. मोहरी १/२ टीस्पून
  5. हिरवी मिरच्या २ बारीक चिरलेल्या
  6. कांदा १ मध्यम बारीक चिरून घेतलेला
  7. टोमॅटो १ मध्यम बारीक चिरलेला
  8. आले लसूण पेस्ट २ टीस्पून
  9. तिखट १ टीस्पून
  10. हळद २ टीस्पून
  11. गरम मसाला १ टीस्पून
  12. धणे पावडर १ टीस्पून
  13. तेल २ टेबलस्पून
  14. मीठ चवीनुसार

सूचना

  1. छोट्या कुकर मध्ये तेल तापायला ठेवा.
  2. जिरे,मोहरी हिरवी मिरची टाका.
  3. बारीक चिरलेला कांदा घालावा, चांगला सोनेरी होईपर्यंत परतवून घ्या.
  4. बारीक चिरलेल टोमॅटो टाका.
  5. तेल वेगळे होईपर्यंत परतवून घ्या.
  6. सगळे सुके मसाले टाका.
  7. भोपळ्याच्या फोडी टाका, बटाट्याच्या फोडी टाका.
  8. मीठ टाका.
  9. १/४ वाटी पाणी टाका.
  10. कुकरचे झाकण लावून २ शिट्या होऊ द्या.
  11. कुकर गार झाल्यावर भाजी एक सर्विग बाउल मध्ये काढून ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर