ज्वारीचे घावन | Jawari ghavan Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Jawari ghavan recipe in Marathi,ज्वारीचे घावन, Teju Auti
ज्वारीचे घावनby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

0

ज्वारीचे घावन recipe

ज्वारीचे घावन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Jawari ghavan Recipe in Marathi )

 • ज्वारीचे पीठ - १ वाटी
 • बारीक रवा - १ चमचा
 • तांदूळ पिठी - १ चमचा
 • तिखट हिंग
 • कोथिंबीर तेल
 • मीठ चवीनुसार

ज्वारीचे घावन | How to make Jawari ghavan Recipe in Marathi

 1. ज्वारीचे पीठ मोठ्या वाडग्यात घ्यावे.
 2. त्यात एक चमचा बारीक रवा, अंदाजानुसार तिखट, मीठ, हिंग आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
 3. तांदूळ पिठी असल्यास घालावे.
 4. सर्व एकत्र करून त्यात हळू हळू पाणी ओतत मिक्स करावे. गुठळ्या होऊ देऊ नयेत. डोसा करतो त्यापेक्षा किंचित पातळ मिश्रण घावनासाठी लागते.
 5. मिश्रण तयार झाला कि त्यात चमचाभर तेल घालावे. गरम नॉनस्टिक तव्यावर पळीने गोलाकार मिश्रण ओतावे. डोशासारखे पसरवू नये. झाकण ठेऊन १ मिनिट शिजू द्यावे. नंतर उलटवून झाकण न ठेवता दुसऱ्या बाजूनेही शिजू द्यावे.
 6. घावन तय़ार झाले.चटणी सोबत खायला दयावे.

My Tip:

कुरकुरीत हवे असल्यास तांदुळ पीठ टाकावे

Reviews for Jawari ghavan Recipe in Marathi (0)