पुरी | Puri Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Puri by Sujata Hande-Parab at BetterButter
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

पुरी recipe

पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Puri Recipe in Marathi )

 • गहू पीठ - १ कप
 • मैदा - १/४ कप
 • रवा बारीक - १ टेबलस्पून 
 • तेल - 1 टेबलस्पून कणिक मळण्यासाठी + 2 टेबलस्पून पुरी लाटण्यासाठी 
 • मीठ - ½ टीस्पून
 • मळण्यासाठी आवश्यक पाणी

पुरी | How to make Puri Recipe in Marathi

 1. एका खोल बाउलमध्ये गव्हाचे पीठ, मैदा, बारीक रवा, मीठ आणि तेल घ्या. चांगले मिक्स करावे
 2. हळूहळू पाणी घालावे आणि घट्ट कणिक मळून घ्यावी. झाकण ठेवून 30 मिनीटे बाजूला ठेवावे.
 3. 10-12 समान भागांमध्ये विभागून घ्या. एक गुळगुळीत चेंडूसारखा आकार द्यावा.
 4. कढईत तेल गरम करावे.
 5. हात आणि रोलिंग बोर्ड किंवा पोळपाटाला तेल लावून घ्यावे .
 6. कणिकचे एक गोळा घेऊन सर्व बाजूंनी समान रीतीने रोल करा. पुरी थोडी जाड असावी.
 7. मध्यम आचेवर पुरी सगळ्या बाजूनी गोल्डन ब्राउन आणि फुगेपर्यंत फ्राय करून घ्याव्यात.
 8. बटाटे भाजी / करी किंवा चहाबरोबर गरमागरम सर्व्ह करा.

My Tip:

कणिक घट्ट मळलेली असावी. पुरी करताना पीठ लावू नये. पीठ तेलात पसरून तेल आणि पुरी करपण्याची शक्यता असते.

Reviews for Puri Recipe in Marathi (0)