बटाट्याची सुकी भाजी | Dry Potato Bhaji Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dry Potato Bhaji recipe in Marathi,बटाट्याची सुकी भाजी, Sujata Hande-Parab
बटाट्याची सुकी भाजीby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

बटाट्याची सुकी भाजी recipe

बटाट्याची सुकी भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dry Potato Bhaji Recipe in Marathi )

 • फोडणीसाठी - तेल - १ टेबलस्पून
 • जिरे - १ टिस्पून
 • मोहरीचे दाणे - १ टिस्पून
 • उडीद डाळ - १/२ टीस्पून (१/२ तास पाण्यात बुजवून घेतलेली, पर्यायी)
 • कढीपत्ता पाने - ५-६
 • हिरव्या मिरच्या - २-३ साधारणपणे चिरून
 • लसूण पाकळ्या - ४ - सोललेली आणि ठेचून घेतलेली 
 • बारीक चिरून कांदा - १ मध्यम
 • हळद पावडर - १/४ टीस्पून. 
 • हींग- १/२ टिस्पून
 • चवीनुसार मीठ
 • भाजी साठी - उकडलेले बटाटे - २ मध्यम
 • ताजा नारळ - १/२ टेबलस्पून (किसलेला)
 • बारीक चिरलेली कोथिंबीर पाने - १ टेबलस्पून 

बटाट्याची सुकी भाजी | How to make Dry Potato Bhaji Recipe in Marathi

 1. नॉनस्टीक पॅनमध्ये तेल गरम करा. जिरे आणि मोहरी घाला. त्याला तडतडू द्या
 2. उडीद डाळ आणि कढीपत्त्याची पाने घाला. काही सेकंद ढवळा.
 3. बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि ठेचून घेतलेल्या लसणीच्या पाकळ्या घाला. कच्चा वास दूर होईपर्यंत तेलात परतून घ्या.
 4. बारीक चिरलेला कांदा आणि मीठ घालावे. पारदर्शक होईपर्यंत शिजवा.
 5. हळद, हिंग घालावे. काही सेकंद ढवळा.
 6. उकडलेले, चोकोनी कापून घेतलेले बटाटे घाला. मिश्रण व्यवस्थित एकजीव होईपर्यंत चांगले मिसळा.
 7. बारीक चिरलेला कोथिंबीर आणि किसलेले नारळ घाला. ढवळा किंवा टॉस करा.
 8. चपाती किंवा रोटी किंवा पुरीसह गरम गरम सर्व्ह करा.

Reviews for Dry Potato Bhaji Recipe in Marathi (0)