मटकी स्टर फ्राय | Mat Bean or Mataki Stir Fry Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mat Bean or Mataki Stir Fry recipe in Marathi,मटकी स्टर फ्राय, Sujata Hande-Parab
मटकी स्टर फ्रायby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  8

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

मटकी स्टर फ्राय recipe

मटकी स्टर फ्राय बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mat Bean or Mataki Stir Fry Recipe in Marathi )

 • मोड आलेली मटकी - १ १/२ कप - (अर्धी वाफवून घेतलेली)
 • तेल - 2 टेबलस्पून 
 • लाल तिखट - 1/4 टीस्पून (पर्यायी)
 • लिंबाचा रस - 1/4 टीस्पून
 • चाट मसाला - 1/2 टीस्पून 
 • चवीनुसार मीठ

मटकी स्टर फ्राय | How to make Mat Bean or Mataki Stir Fry Recipe in Marathi

 1. रात्री मटकी २ कप पाण्यात भिजत ठेवावी.
 2. दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी काढून टाकून मटकी एका मलमलच्या कपड्यात किंवा चाळणी मध्ये ५-६ तास मोड येण्यासाठी ठेवावी. जर जास्त ड्राय वाटत असेल तर मध्ये मध्ये थोडे पाणी शिंपडावे. नॉनस्टिक कढईत तेल गरम करावे. अंकुरित अर्धी शिजवून घेतलेली मटकी घालावी.
 3. मीठ घालावे. चांगले मिक्स करावे
 4. मध्यम मंद आचेवर थोडी कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावी. आवश्यक असल्यास थोडे पाणी शिंपडा.
 5. लाल मिरची पूड घाला. काही सेकंद ढवळा.
 6. एक प्लेट मध्ये काढा. लिंबाचा रस घाला. चाट मसाला घाला आणि अलगद टॉस करून घ्या . गरम सर्व्ह करा.
 7. आपल्या आवडीप्रमाणे बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटोही घाऊ शकता. शक्यतो लहान मुलांसाठी बनवताना वगळावा.

Reviews for Mat Bean or Mataki Stir Fry Recipe in Marathi (0)