मुख्यपृष्ठ / पाककृती / मिश्र डाळींची इडली

Photo of Mix Split Lentil Idli by Sujata Hande-Parab at BetterButter
578
9
0.0(0)
0

मिश्र डाळींची इडली

Jul-19-2018
Sujata Hande-Parab
495 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिश्र डाळींची इडली कृती बद्दल

इडली हि एक दक्षिण भारतीय डिश असून संपूर्ण भारतामध्ये बरीच लोकप्रिय आहे. तांदूळ- उडीद डाळीचे मिश्रण वाफवून ती गरमा गरम सांबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह केली जाते. नास्ता, टिफिन, किंवा काही वेळा जेवणामध्ये हि खाल्ली जाते. मी हि इडली मिश्र डाळींचे मिश्रण आणि थोडे मसाले वापरून बनवली आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • साऊथ इंडियन
  • व्हिस्कीन्ग
  • ब्लेंडींग
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. मिश्र डाळी - 1 कप (रात्रभर भिजवून घेतलेले)
  2. इडली तांदूळ –१/४ कप टेबलस्पून. (रात्रभर भिजलेले)
  3. हिरवी पेस्ट - बारीक चिरून कोथिंबीर - १/४ कप
  4. लसूण पाकळ्या - २
  5. धणेपूड - १/२ टिस्पून
  6. पाणी - १-२ कप रात्रभर भिजवण्यासाठी + ३/४ -१ कप 
  7. इनो - १ पॅकेट
  8. तेल - २ टेबलस्पून
  9. चवीनुसार मीठ. 

सूचना

  1. एका ब्लेंडर किंवा मिक्सरला कोथिंबीर, लसूण पाकळ्या बारीक वाटून घ्या.
  2. तांदूळ आणि मिश्र डाळी रात्रभर पाण्यात भिजवून घ्या.
  3. दुसऱ्या दिवशी मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या. मीठ, तयार हिरवी पेस्ट, कोथिंबीर पावडर घालावी.
  4. आवश्यकतेनुसार पाणी घालावे आणि मिश्रण बनवून घ्यावे. जास्त पातळ किंवा जाड नसावे. इडली पात्रात पाणी घालून ते गरम करून घ्यावे. साच्यांना तेल लावून घ्यावे.
  5. बनवलेल्या मिश्रणामध्ये एक इनो चे पॅकेट कापून इनो अलगद मिक्स करून घ्यावा. जास्त ढवळू नये.
  6. तेल लावलेल्या साच्यात मिश्रण अलगद भरून घ्यावे आणि इडली पात्रात १०-१२ मिनिटे मध्यम कमी आचेवर वाफवून घावे.
  7. टूथ पीक घालून इडलीज झाल्या आहेत कि नाही ते चेक करावे.
  8. बाहेर कडून थोड्या थंड होऊ द्याव्यात.
  9. गरमा गरम सांबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह कराव्यात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर