मुख्यपृष्ठ / पाककृती / भरलेली भेंडी

Photo of Stuffed okra by Teju Auti at BetterButter
411
10
0.0(0)
0

भरलेली भेंडी

Jul-19-2018
Teju Auti
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरलेली भेंडी कृती बद्दल

तिखट व चवदार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १०-१२ भेंडी
  2. ६-७ पाकळ्या लसूण
  3. तेल (फोडणीसाठी) १ मोठा चमचा.
  4. बेसन १ मोठा चमचा
  5. शेंगदाण्याचे कुट २ मोठा चमचा
  6. हिंग (चिमटीभर)
  7. हळद १/२ छोटा चमचा
  8. मिठ (चवीनुसार)
  9. कांदा लसुण मसाला ,लाल मिरची पावडर २ छोटा चमचा
  10. जिरे पावडर १चमचा

सूचना

  1. १०-१२ भेंडी धुवून, पुसून घ्यावीत. देठ आणि टोकं कापून टाकावीत व मधे उभी चीर द्यावी.
  2. लसूण ठेचून घ्यावी
  3. सगळे साहित्य एकत्र करुन मसाला तयार करुन घ्यावा.
  4. चीर दिलेल्या भेंड्यांमध्ये मसाला भरुन घ्यावा. शिल्लक मसाला भेंड्यांना बाहेरुन सुद्धा लावावा.
  5. तेलाची फोडणी करुन त्यात लसूण पाकळ्या घालाव्यात.
  6. त्यात भरलेली भेंडी नीट लावावीत. शिल्लक मसाला घालावा.
  7. झाकण ठेवून,मंद गॅसवर शिजवावीत.
  8. पाणी अजिबात घालू नये. थोडी शिजली की, झाकण काढून, पुन्हा थोडे तेल सोडून, खरपूस, चुरचुरीत होईपर्यंत हलवत राहावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर