श्रीखंड पुरी भाजी | Shrikhand puri bhaji Recipe in Marathi

प्रेषक Smita Koshti  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Shrikhand puri bhaji recipe in Marathi,श्रीखंड पुरी भाजी, Smita Koshti
श्रीखंड पुरी भाजीby Smita Koshti
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

श्रीखंड पुरी भाजी recipe

श्रीखंड पुरी भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shrikhand puri bhaji Recipe in Marathi )

 • श्रीखंड साठी.. 1वाटी चक्का
 • 1 वाटी पीठी साखर
 • चिमूटभर वेलची पूड
 • अर्धा चिमूटभर जायफळ पूड
 • भाजीसाठी... 3 उकळून सोललेले बटाटे
 • 2 बारीक चिरलेले कांदे
 • 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
 • 4 पानं कढीपत्ता
 • 1 चमचा आलं लसूण पेस्ट
 • 1/2 चमचा जिरे, मोहरी
 • चिमूटभर हिंग
 • 1/4 चमचा हळद
 • 1/4 चमचा गरम मसाला
 • 1 छोटी पळी तेल
 • थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली
 • पूरी साठी... कणीक
 • मीठ
 • तेल। तळनासाठी

श्रीखंड पुरी भाजी | How to make Shrikhand puri bhaji Recipe in Marathi

 1. चक्का घट्ट हवा. त्यात पीठी साखर, वेलची पूड, जायफळ पूड घालून चांगले मिक्स करून घ्या व फ्रीज मधे ठेवा. श्रीखंड तयार.
 2. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जिरे तडतडल्यावर त्यात हिंग, कढीपत्ता हिरव्या मिरच्या व कांदा घालून चांगले परतून घ्या.
 3. नंतर त्यात हळद, बटाट्याच्या फोडी, मीठ, गरम मसाला घालून चांगले परतून घ्या.
 4. वाफ आली की गॅस बंद करून कोथिंबीर घालून आणखी परतून घ्या. व गॅस बंद करा. भाजी तयार आहे.
 5. पुरी साठी कणीक मीठ घालून घट्ट मळून घ्या. व पूर्या लाटुन तळून घ्या.
 6. व भरा पटापट डबा.

My Tip:

चक्का म्हणजेच हंग कर्ड. निथळलेले दही. पूरीसाठी कणकेत चिमूटभर साखर टाकावी पूरी जास्त वेळ फुललेली राहते.

Reviews for Shrikhand puri bhaji Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo