मुख्यपृष्ठ / पाककृती / ओट्स कोथिंबीर वडी

Photo of Baked oats kothimbir vadi by seema Nadkarni at BetterButter
715
6
0.0(0)
0

ओट्स कोथिंबीर वडी

Jul-19-2018
seema Nadkarni
60 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओट्स कोथिंबीर वडी कृती बद्दल

कोथिंबीर वडी आणि ओट्स

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. 1/2 किलो कोथिंबीर
  2. 2 कप ओट्स
  3. 1 कप बेसन
  4. 8-10 लसूण पाकळ्या
  5. 1 तूकडा आले
  6. 1/4 कप तेल
  7. 1 चमचा तीळ
  8. 4-5 हिरव्या मिरच्या
  9. 1/4 कप दही
  10. 1/2 चमचा लाल तिखट
  11. 1/4 चमचा हळद
  12. 1-2 चमचा साखर
  13. चवी पुरते मीठ
  14. 1/2 चमचा कूकिंग सोडा

सूचना

  1. सौ प्रथम एका भांड्यात कोथिंबीर स्वच्छ धुवून, बारीक चिरून घ्यावी.
  2. 2 कप ओट्स ला मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे.
  3. कोथिंबीर च्या मिश्रणात तेल, आले लसुण मिरची पेस्ट, दही, हळद, लाल तिखट, घालून एकत्र करावे.
  4. या मिश्रणात ओट्स आणि बेसनाचे पीठ घालून एकत्र करावे.
  5. ओवन ला प्री हिट करून घ्या.
  6. बेकिंग ट्रे मध्ये तेलाचा हात लावून घ्या, त्यात वरील कोथिंबीर चे मिश्रण घालून घ्या.
  7. बेकिंग ट्रे ला ओवन मध्ये ठेवून 30 - 40 मिनिटे बेक करुन घ्या.
  8. बेक झाले कि त्या वर तेल किंवा बटर लावून घ्या.
  9. थंड झाल्यावर त्याचे चऊरस तुकडे करून घ्यावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर