कच्च्या केळांची भाजी | Raw banana stir fry Recipe in Marathi

प्रेषक Susmita Tadwalkar  |  20th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Raw banana stir fry recipe in Marathi,कच्च्या केळांची भाजी, Susmita Tadwalkar
कच्च्या केळांची भाजीby Susmita Tadwalkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

4

0

कच्च्या केळांची भाजी recipe

कच्च्या केळांची भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Raw banana stir fry Recipe in Marathi )

 • ३ कच्ची केळी
 • मोहरी, जिरे, हिंग, हळद आवडीप्रमाणे
 • तिखट, मिठ चवीप्रमाणे
 • १/४ चमचा आमचूर पावडर
 • २ चमचे तेल
 • १ मोठा चमचा दाण्याचा कूट
 • १ मोठा चमचा खोवलेलं खोबरं
 • पाव वाटी बारिक चिरलेली कोथिम्बीर

कच्च्या केळांची भाजी | How to make Raw banana stir fry Recipe in Marathi

 1. कच्ची‌ केळी सालासकट १/२ करा व‌ किंचित हळद घालून कूकर मध्ये घालून ३ शिट्या करून घ्या
 2. गार करून सालं काढून घ्या व मध्यम आकाराच्या फोडी करा
 3. कढ‌ईमध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढिपत्ता घालून फोडणी करा
 4. केळाच्या फोडी घालून‌निट मिक्स करा
 5. त्यात तिखट, मिठ, आमचूर पावडर, दाण्याचा कूट, कोथिम्बीर, खोबरं घाला
 6. २-३ मिनिटं परतून झाल्यावर गॅस बंद करा व थोड्या वेळानी डब्यात भरा

My Tip:

नुसती खायला तर छान लागतेच पण दही भाताबरोबर पण मस्त लागते

Reviews for Raw banana stir fry Recipe in Marathi (0)