रोटी कबाब | Roti kabab Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  20th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Roti kabab recipe in Marathi,रोटी कबाब, seema Nadkarni
रोटी कबाबby seema Nadkarni
 • तयारी साठी वेळ

  60

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  36

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

रोटी कबाब recipe

रोटी कबाब बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Roti kabab Recipe in Marathi )

 • 4-5 पोळ्या / पराठे (उरलेल्या असेल तर चांगलेच आहे)
 • 1 कप ब्रेड क्रम्स
 • 2-3 उकडलेले बटाटे
 • 1 वाटी बारीक चिरलेला कांदा
 • 1/2 वाटी बारीक चिरलेला गाजर
 • 1/2 वाटी बारीक चिरलेला भोपळी मिरची
 • 1/4 वाटी बारीक चिरलेला बीट
 • 2-3 चमचा आले लसुण पेस्ट
 • 1/2 वाटी चीज चे छोटे छोटे लांबट आकाराचे तुकडे
 • 2 चमचा लाल तिखट
 • 1 चमचा धणे जिरे पावडर
 • थोडा गरम मसाला
 • चवी पुरते मीठ
 • थोडी हळद
 • 2 लिंबू चा रस
 • थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली
 • 1/2 चमचा चाट मसाला

रोटी कबाब | How to make Roti kabab Recipe in Marathi

 1. * सौ प्रथम एका मिक्सर च्या भांड्यात पोळी चे मोठे तुकडे करून बारीक पावडर करून घ्या.
 2. * ह्या पोळी च्या पावडर ला एका भांड्यात काढून घ्या, त्यात ब्रेड क्रम्स घालून एकत्र करावे.
 3. * या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, केप्सीकम, गाजर, बीट आणि कोथिंबीर घालून एकत्र करावे.
 4. *वरील मिश्रणात मीठ, मिरची पूड, हळद, धणे जिरे पावडर, चाट मसाला, थोडा गरम मसाला आणि लिंबाचा रस घालून एकत्र करून घ्यावे.
 5. * चीज चे छोटे छोटे लांबट आकाराचे तुकडे करुन घ्या आणि मग त्याना या कबाब मध्ये ठेवून रोल तयार करून घ्या
 6. * चीज चे छोटे छोटे लांबट आकाराचे तुकडे करुन घ्या.
 7. * या मिश्रणा चे छोटे छोटे लांबट आकाराचे रोल तयार करून घ्या.
 8. * या कबाब ला ब्रेड क्रम्स आणि कोनफ्लोर च्या मिश्रणात बुडवून ठेवावे आणि तेलात तळून घ्यावे किंवा पेन मध्ये थोडे तेल घालून फ्राय करून घ्यावे.
 9. * अश्या प्रकारे बाकी चे कबाब तयार करून घ्या. मुलांना हे कबाब खूप आवडतील अशी अपेक्षा आहे.

My Tip:

पोळी किंवा चपाती उरलेले असेल तर चांगलेच आहे.

Reviews for Roti kabab Recipe in Marathi (0)