Photo of Roti kabab by seema Nadkarni at BetterButter
1087
4
0.0(0)
0

Roti kabab

Jul-20-2018
seema Nadkarni
60 मिनिटे
तयारीची वेळ
36 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • शॅलो  फ्रायिंग
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 4-5 पोळ्या / पराठे (उरलेल्या असेल तर चांगलेच आहे)
  2. 1 कप ब्रेड क्रम्स
  3. 2-3 उकडलेले बटाटे
  4. 1 वाटी बारीक चिरलेला कांदा
  5. 1/2 वाटी बारीक चिरलेला गाजर
  6. 1/2 वाटी बारीक चिरलेला भोपळी मिरची
  7. 1/4 वाटी बारीक चिरलेला बीट
  8. 2-3 चमचा आले लसुण पेस्ट
  9. 1/2 वाटी चीज चे छोटे छोटे लांबट आकाराचे तुकडे
  10. 2 चमचा लाल तिखट
  11. 1 चमचा धणे जिरे पावडर
  12. थोडा गरम मसाला
  13. चवी पुरते मीठ
  14. थोडी हळद
  15. 2 लिंबू चा रस
  16. थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली
  17. 1/2 चमचा चाट मसाला

सूचना

  1. * सौ प्रथम एका मिक्सर च्या भांड्यात पोळी चे मोठे तुकडे करून बारीक पावडर करून घ्या.
  2. * ह्या पोळी च्या पावडर ला एका भांड्यात काढून घ्या, त्यात ब्रेड क्रम्स घालून एकत्र करावे.
  3. * या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, केप्सीकम, गाजर, बीट आणि कोथिंबीर घालून एकत्र करावे.
  4. *वरील मिश्रणात मीठ, मिरची पूड, हळद, धणे जिरे पावडर, चाट मसाला, थोडा गरम मसाला आणि लिंबाचा रस घालून एकत्र करून घ्यावे.
  5. * चीज चे छोटे छोटे लांबट आकाराचे तुकडे करुन घ्या आणि मग त्याना या कबाब मध्ये ठेवून रोल तयार करून घ्या
  6. * चीज चे छोटे छोटे लांबट आकाराचे तुकडे करुन घ्या.
  7. * या मिश्रणा चे छोटे छोटे लांबट आकाराचे रोल तयार करून घ्या.
  8. * या कबाब ला ब्रेड क्रम्स आणि कोनफ्लोर च्या मिश्रणात बुडवून ठेवावे आणि तेलात तळून घ्यावे किंवा पेन मध्ये थोडे तेल घालून फ्राय करून घ्यावे.
  9. * अश्या प्रकारे बाकी चे कबाब तयार करून घ्या. मुलांना हे कबाब खूप आवडतील अशी अपेक्षा आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर