बेक्ड मसाला वडा | Baked Masala Vada Recipe in Marathi

प्रेषक Sreevalli Emani  |  18th Aug 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Baked Masala Vada by Sreevalli Emani at BetterButter
बेक्ड मसाला वडाby Sreevalli Emani
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1438

0

बेक्ड मसाला वडा recipe

बेक्ड मसाला वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Baked Masala Vada Recipe in Marathi )

 • 1/4 वाटी चणाडाळ
 • 1/4 वाटी तूरडाळ
 • 2 लहान चमचे जिरे
 • 2 हिरव्या मिरच्या
 • 2 लहान चमचे किसलेले आले
 • अर्धी वाटी चिरलेला कांदा
 • थोडा कडीपत्ता
 • 1 लहान चमचा तेल
 • 1 लहान चमचा लाल तिखट
 • अर्धा लहान चमचा बेकिंग पावडर
 • मीठ चवीनुसार

बेक्ड मसाला वडा | How to make Baked Masala Vada Recipe in Marathi

 1. चणाडाळ आणि उडीदडाळ धुवून अर्धा ते 3 तास भिजवून ठेवा. बेकिंग शीटवर पार्चमेंट पेपर लावा आणि तुमचे ओव्हन 180 अंश सेल्सियस तापमानावर गरम करा.
 2. डाळीचे पाणी गाळून त्यात जिरे, हिरवी मिरची, आले, कडीपत्ता आणि कांदा एकत्र करून जाडेभरडे वाटा.
 3. या मिश्रणाला एका वाडग्यात काढून त्यात मीठ, मिरची आणि बेकिंग पावडर घाला. मिश्रण घट्ट बनवा.
 4. नंतर मिश्रण लहान चेंडूच्या आकाराचे बनवा आणि त्याला थोडे दाबून चपटे करा आणि बेकिंग शीटवर ठेवा. (चित्रात दाखविल्याप्रमाणे)
 5. नंतर त्यांना 10 मिनिटे बेक करून ओव्हनमधून काढा. वड्याच्या दोन्ही बाजूस थोडे थोडे तेल लावा आणि पुन्हा 200 अंश सेल्सियस तापमानावर 15 मिनिटांसाठी बेक करा.
 6. वडे वरील बाजूला कुरकुरीत व्हायला लागले की दुसऱ्या बाजूने गुलाबी झाले आहेत की नाही ते तपासा.
 7. चांगले शिजल्यानंतर त्यांना ओट्यावर काढून ठेवा आणि चटणी/कॅचपबरोबर गरम गरम वाढा.

My Tip:

दिलेल्या साहित्याच्या व्यतिरिक्त तुम्ही 1 मोठा चमचा आले-लसणाची पेस्ट घालून वड्याचा स्वाद वाढवू शकता.

Reviews for Baked Masala Vada Recipe in Marathi (0)