शेंग बटाटा रस्सा भाजी | Sheng Batata Rassa Bhaji Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  21st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sheng Batata Rassa Bhaji recipe in Marathi,शेंग बटाटा रस्सा भाजी, Deepa Gad
शेंग बटाटा रस्सा भाजीby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

शेंग बटाटा रस्सा भाजी recipe

शेंग बटाटा रस्सा भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sheng Batata Rassa Bhaji Recipe in Marathi )

 • शेवग्याच्या शेंगा ३
 • बटाटे ३
 • कांदा १
 • टोमॅटो १
 • कढीपत्ता
 • मालवणी मसाला २ च
 • हिंग
 • भाजलेल्या कांदा खोबऱ्याचे वाटण
 • कोथिंबीर
 • तेल
 • मीठ

शेंग बटाटा रस्सा भाजी | How to make Sheng Batata Rassa Bhaji Recipe in Marathi

 1. शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करून घ्या, बटाटे कापून पाण्यात घालून ठेवा
 2. कढईत तेल घालून कढीपत्ता, हिंग, चिरलेला कांदा घालून परतून घ्या
 3. आलं कसून पेस्ट, अर्धा टोमॅटो कापलेला घाला, परता
 4. मालवणी मसाला, मीठ, शेंगा टाकून परता थोडं पाणी घालून ५ मिनिटे शिजवा
 5. नंतर बटाट्याचे तुकडे व अर्ध्या टोमॅटोचेवतुकडे करून घाला, आवश्यकतेनुसार पाणी घालून मंद गॅसवर झाकण ठेवून शिजवा
 6. बटाटे शिजत आले की वाटण हवं तेवढं टाकून शिजवा, कोथिंबीर पेरा
 7. तयार आहे टिफिनसाठी शेंग बटाटा रस्सा भाजी
 8. मधल्या वेळच्या खण्यासाठी उपमा, केक यासारखे काही टिफिनला दिले तर बच्चे कंपनीही खुश

My Tip:

सकाळी घाईच्या टायमाला वाटण तयार असेल तर कुठलीही रस्सा भाजी किंवा उसळ पटकन करू शकतो

Reviews for Sheng Batata Rassa Bhaji Recipe in Marathi (0)