मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंग बटाटा रस्सा भाजी

Photo of Sheng Batata Rassa Bhaji by Deepa Gad at BetterButter
1657
3
0.0(0)
0

शेंग बटाटा रस्सा भाजी

Jul-21-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंग बटाटा रस्सा भाजी कृती बद्दल

शेंगात कॅल्शियमची भरपूर मात्रा असल्यामुळे हाडांसाठी मुलांना किंवा मोठ्यांनाही उपयोगी अशी ही शेंग. वाटण तयार करून ठेवलेलं असेल तर टिफिनसाठीही द्यायला मिळते, मी ८ दिवसाचं वाटण करून फ्रीझरमध्ये ठेवते त्यामुळे सकाळी घाईच्या वेळेला खूप उपयोगी पडते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. शेवग्याच्या शेंगा ३
  2. बटाटे ३
  3. कांदा १
  4. टोमॅटो १
  5. कढीपत्ता
  6. मालवणी मसाला २ च
  7. हिंग
  8. भाजलेल्या कांदा खोबऱ्याचे वाटण
  9. कोथिंबीर
  10. तेल
  11. मीठ

सूचना

  1. शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करून घ्या, बटाटे कापून पाण्यात घालून ठेवा
  2. कढईत तेल घालून कढीपत्ता, हिंग, चिरलेला कांदा घालून परतून घ्या
  3. आलं कसून पेस्ट, अर्धा टोमॅटो कापलेला घाला, परता
  4. मालवणी मसाला, मीठ, शेंगा टाकून परता थोडं पाणी घालून ५ मिनिटे शिजवा
  5. नंतर बटाट्याचे तुकडे व अर्ध्या टोमॅटोचेवतुकडे करून घाला, आवश्यकतेनुसार पाणी घालून मंद गॅसवर झाकण ठेवून शिजवा
  6. बटाटे शिजत आले की वाटण हवं तेवढं टाकून शिजवा, कोथिंबीर पेरा
  7. तयार आहे टिफिनसाठी शेंग बटाटा रस्सा भाजी
  8. मधल्या वेळच्या खण्यासाठी उपमा, केक यासारखे काही टिफिनला दिले तर बच्चे कंपनीही खुश

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर