बटाटा पँटीस | Potatoes patice Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  21st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Potatoes patice recipe in Marathi,बटाटा पँटीस, Teju Auti
बटाटा पँटीसby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

4

0

बटाटा पँटीस recipe

बटाटा पँटीस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potatoes patice Recipe in Marathi )

 • बटाटे - ४ मध्यम
 • लसूण आलं लिंबू
 • कोथिंबीर
 • तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर
 • ब्रेडक्रम्स / तांदुळाची पिठी /
 • बारीक रवा - २ मोठे चमचे

बटाटा पँटीस | How to make Potatoes patice Recipe in Marathi

 1. बटाटे मऊ उकडावेत व साले काढून मॅश करावेत.
 2. ग्राईंडरमधून आलं-लसूण-जिऱ्याची पेस्ट करावी.
 3. मॅश केलेल्या बटाट्यात ही पेस्ट, तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर व लिंबू घालून हाताने नीट एकजीव करावे. या मिश्रणाचे चपटे गोळे करायचे आहेत. आकार नीट व्हावा यासाठी ब्रेडक्रम्स / तांदुळाची पिठी टाकावी
 4. आधी हाताला तेल लावावे आणि एक एक भाग मिश्रण घेऊन त्यात वरील पैकी एक गोष्ट मिसळून गोल चापट आकार द्यावा.
 5. हे गोळे बारीक रव्यात घोळवावेत.
 6. पसरट तव्यावर किंवा फ्रायपॅनमध्ये शॅलोफ्राय करावे, आधी पॅनला तेल लावून पॅटीस ठेवावे. जरा वेळाने उलटवावे. बारीक रव्यामुळे क्रिस्पी सोनेरी होते.

Reviews for Potatoes patice Recipe in Marathi (0)