मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटो भाजी आणि वांग्याचे भरीत सोबत ज्वारीची भाकरी

Photo of Tomato & brinjal vegi with bhakri by Manasvi Pawar at BetterButter
1077
3
0.0(0)
0

टोमॅटो भाजी आणि वांग्याचे भरीत सोबत ज्वारीची भाकरी

Jul-21-2018
Manasvi Pawar
25 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटो भाजी आणि वांग्याचे भरीत सोबत ज्वारीची भाकरी कृती बद्दल

या दोन्ही भाज्या आपण तोंडी लावणे म्हणून डब्यात देऊ शकतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 4

  1. टोमॅटो भाजी साहित्य
  2. दोन टोमॅटो बारीक चिरून
  3. दोन कांदे बारीक चिरून
  4. तेल फोडणीसाठी
  5. मोहरी
  6. हिंग
  7. हळद
  8. ४ हिरव्या मिरच्या
  9. कढीपत्ता
  10. कोथिंबीर
  11. दोन चमचे ओल खोबर किसून
  12. एक चमचा दाण्याचा कूट
  13. मीठ चवीनुसार
  14. साखर चवीप्रमाणे आवडीनुसार
  15. वांग्याचे भरीत साहित्य
  16. एक मोठं भरीताच वांग
  17. एक चमचा तेल
  18. एक कांदा बारीक चिरून
  19. मीठ चवीनुसार
  20. लाल तिखट
  21. कोथिंबीर

सूचना

  1. टोमॅटो चर्या भाजी साठी एका भांड्यात फोडणीसाठी तेल गरम करावे
  2. त्यामध्ये मोहरी हिंग कढीपत्ता कांदा मिरची घालून परतावे
  3. हळद घालून टोमॅटो च्या फोडी घालून व्यवस्थित परतावे
  4. एक दोन वाफ काढाव्यात मीठ आणि ओलं खोबरं दाण्याचा कूट घालून परतावे
  5. गॅस बंद करून कोथिंबीर घालावी
  6. वाग्यांचे भरीत करण्यासाठी वांगे धुऊन कोरडे करून घ्यावे
  7. वांग्याला सुरीने मधे कोचावे आणि तेलाचा हात फिरवावा
  8. आता मंद आचेवर वांग भाजून घ्यावे
  9. भाजल्यावर थोडं थंड झाल्यावर हलकेच सालं काढून टाकावे देठ कापून टाकावे
  10. वांग्याचे बारीक तुकडे करून धुऊन घ्या
  11. आता एका ताटात वांग्याचे तुकडे कांदा मीठ तेल लाल तिखट आणि कोथिंबीर घालून एकजीव करावे
  12. भाकरीसोबत खाण्यास तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर