खारीक आंबा रवा रोल | Kharik mango rava roll Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  21st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kharik mango rava roll recipe in Marathi,खारीक आंबा रवा रोल, deepali oak
खारीक आंबा रवा रोलby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

4

0

खारीक आंबा रवा रोल recipe

खारीक आंबा रवा रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kharik mango rava roll Recipe in Marathi )

 • एक वाटी रवा
 • आंब्याचे तुकडे मीक्सरला वाटुन १ वाटी
 • दोन वाटी दुध
 • एक वाटी पीठी साखर
 • वेलची पावडर १चमचा
 • साजूकतुप २/३ चमचे
 • सुके खोबरे किसुन अर्धी वाटी
 • खारीक किसुन किंवा पावडर 1 वाटी

खारीक आंबा रवा रोल | How to make Kharik mango rava roll Recipe in Marathi

 1. रवा कोरडाच मंद आचेवर भाजुन घ्या पण रव्याचा रंग लालसर करू नका
 2. आता ह्यात एक वाटी दुध घालून शिजवा व कोरडे करा
 3. आता मीक्सर ला फीरवलेला आंबा व परत एक वाटी दुध घालून मऊ शिजवा पण मीश्रण पातळ करू नका
 4. आता हे कोमट असताना मळा छान मळुन गार होत आले कि खोबरे व खारीक पावडर वेलची पावडर मीक्स करा
 5. गार झाले कि पीठी साखर घालून मळा,पीठी साखरे मुळे हे सैल पडत जाईल पण नंतर परत घट्ट होत जाईल
 6. आता हाताला तुप लावून ह्याचे लांब गोळे बनवून ढोकळा वाफवतो तसेच चाळणीला तुप लावून त्यात ठेवून १०मिनीटे वाफवून घ्या
 7. आता हे पुन्हा खारीक पावडरमध्दे घोळवून तयार झाले
 8. डब्यात दयायला तयार

My Tip:

रवा गरम असताना पीठी साखर घालू नका.सैल होईल,आणि गार असताना घातली तर आधी रवा सैल होईल पण मीक्स करत असताना पुन्हा नीट होईल

Reviews for Kharik mango rava roll Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती